घृणास्पद ! घरच्यांना सांगितलं मुलीला फिरवून आणतो; मात्र बॉक्सिंग कोचच्या मनात होतं दुसरंच काही

घृणास्पद ! घरच्यांना सांगितलं मुलीला फिरवून आणतो; मात्र बॉक्सिंग कोचच्या मनात होतं दुसरंच काही

मुंबई : मायानगरी मुंबईतून एक धक्कादायक आणि तळपायाची आग मस्तकात पोहोचवणारी बातमी समोर येतेय. मुंबईच्या घाटकोपरमधील टीळक नगर भागात  १४ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडलीये. धक्कादायक बाब म्हणजे एका बॉक्सिंग कोचने १४ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचे आरोप आहेत. पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ कारवाई करत बाँक्सिंग कोचला १४ वर्षीय मुलीवर बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केली आहे. मुंबईतील घाटकोपरमधील टिळक नगर पोलिसांनी आरोपीविरोधात कारवाई करत बॉक्सिंग कोचला चेंबूर परिसरातून अटक केली आहे. 

मुलीने टिळकनगर पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी तिची तब्येत ठिक नव्हती. त्यावेळी मुलीला बाहेर फिरायला नेतो सांगून आरोपीने मुलीला स्वतःच्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केले. पीडित मुलीवर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत.

सदर मुलगी ज्या ठिकाणी बॉक्सिंगचे धडे गिरवत होती तिथे आरोपी हेड कोच म्हणून कार्यरत होता. हा कोच मुलीला स्वतःच्या घरी घेऊन गेला आणि तिथे तिच्यावर अतिप्रसंग केला. या सर्व भीषण प्रकरणानंतर आरोपी कोचने मुलीला धमकी देखील दिली. सदर प्रकाराबाबत कुणाला सांगितलं तर तुझं बॉक्सिंग करिअर संपवीन अशी धमकी या नराधमाने मुलीला दिली.

मात्र घरी आल्यानंतर मुलीने घडलेला सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. यानंतर घरच्यांनी तिला राजावाडी रुग्णालयात दाखल केलं आणि टिळक नगर पोलीस स्टेशनमध्ये कोचविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. दरम्यान पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली.

mumbai crime news boxing coach arrested from chembur under pocso act

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com