डी गँगच्या ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश! NCB कडून धक्कादायक गोष्टी जप्त

डी गँगच्या ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश! NCB कडून धक्कादायक गोष्टी जप्त

मुंबई, ता.21 :  डोंगरी परिसरत चालणाऱ्या डी गँगच्या ड्रग्ज फॅक्टरीचा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने  (NCB ) पर्दाफाश केला आहे. ही फँक्ट्री चालण्यामागे कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिम आणि कुख्यात तस्कर कैलास राजपूत असल्याचे समोर आले आहे. या कारवाई दरम्यान एनसीबी ने तब्बल 12 किलो ड्रग्ज आणि सव्वा दोन कोटीची रोकड एनसीने जप्त केली आहे. ही फॅक्टरी चालवणारा सराईत आरोपी आरिफ भुजवीला हा 58 वर्षीय इसम पसार झाला असून त्याला पकडण्यासाठी एनसीबीने लूक आऊट सर्कुलर जारी केली आहे.

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी धडक कारवाई करत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक चिंकू पठाणला बेड्या ठोकल्या आहे. चिंकू पठाण हा गँगस्टर करीम लालाचा नातेवाईक आणि हस्तक असल्याची माहिती समोर आली आहे.

NCB ने गेल्या काही दिवसांपासून मुंबई अंमली पदार्थाची तस्करी करण्याचे कंबरडे मोडले आहे. याच कारवाई दरम्यान, एनसीबीने गँगस्टर चिंकू पठाण आणि त्याचा साथीदार नझीम हक याला नवी मुंबईतील घणसोली येथून अटक करण्यात आली आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांना त्याच्या घरात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि घात शस्त्रही आढळून आले आहेत.

पोलिसांची कूणकूण लागावी म्हणून चिंकूने तो राहत असलेल्या गल्लीत कॅमेरे लावले होते. ऐवढच नाही तर घरात कुणालाही प्रवेश नव्हता. अनोळखी व्यक्तींनी प्रवेश करू नये म्हणून त्याने घराबाहेर बायोमॅट्रीक मशीन लावली होती. या कारवाईतून मिळालेल्या माहितीच्या आधारावरचं एनसीबीने भिंवडीत एक कारवाई करत, या टोळीचा हस्तक रोहित वर्मा याला एनसीबी ने अटक केली.

यावेळी अटकेची कारवाई टाळण्यासाठी रोहितने अनेक उचापती केल्या, परिसरातील नागरिकांना जमवून गोंधळ घातला आणि शिवीगाळ देखील केला. मात्र एनसीबीच्या अधिकार्यांसमोर काहीच चालत नसल्याने सुटकेसाठी त्याने अधिकाऱ्याच्या हाताचा चावा घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अपयशी ठरला.

रोहितच्या आणि चिंकू पठाणच्या अटकेनंतर काही तासात एनसीबीने डोंगरीच्या नूर मंजिलमध्ये मोठी कारवाई केली. या इमारतीचा संपूर्ण पाचवा मजला हा आरिफचा होता. या कारवाई दरम्यान एनसीबी चे अधिकारी या तस्करी मध्ये असलेला मुख्य सूत्रधार आरिफ भुजवीला याला पकडण्यासाठी  गेले होते.

मात्र चिंकू आणि रोहितच्या अटकेची माहिती मिळाल्यानंतर आरिफने घरातून पळ काढला. आरिफच्या घरातल्यांना ही त्याला पळून जाण्यास मदत केली. एनसीबीने आरीफच्या घराची झडती घेतली असता. आरिफने घरातल्या एका खोलीतच ड्रग्ज बनवण्याची फँक्ट्री सुरू केली होती.

एनसीबी ला ड्रग्ज बनवण्याचे साहित्य जप्त केले आहे. एनसीबीने या कारवाईत दोन कोटी 18 लाख रोकड आणि 12 किलो ड्रग्ज जप्त केले आहे. ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात 10 कोटीहून अधिक किंमत आहे. आरिफच्या घरातही एनसीबीला एक स्मिथ वासन कंपनीचे रिव्हाल्वर सापडले आहेे. त्याचबरोबर घरात 8 ते 9 महागड्या कारच्या चाव्या सापडल्या आहेत.

एनसीबीच्या अधिकाऱ्यांना आरिफच्या ड्रग्ज फँक्टरीतून 2 ते 3 डायरी सापडल्या आहेत. त्यात त्याने ड्रग्जसंदर्भातले व्यवहार लिहून ठेवले आहेत. अंदाजे 5 ते 6 वर्षापासून आरिफ ही लॅब चालवत असल्याचा अंदाज एनसीबीच्या अधिकाऱ्यांना आहे. या ड्रग्स तस्करीतून मिळणाऱ्या पैशांवर आरिफ मौजमजा करत होता.

महाराष्ट्रात आरिफ हा सर्वात मोठ ड्रग्ज डिलर असून हा ड्रग्ज माफिया कैलास राजपूत गँगसाठी काम करत होता. कैलास राजपूत आणि दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिम हे या तस्करीतील मुख्य सूत्रधार आहेत. आता पर्यंत ही टोळी सात देशांमध्ये विविध प्रकारच्या खाण्याच्या पाकिटातून ड्रग्जची तस्करी करत होती.

नुकतीच ही टोळी साखरेच्या पाकिटातून ड्रग्ज दुबईला पाठवणार होते. मात्र एनसीबीच्या कारवाईमुळे त्यांचा प्रयत्न फसला. एनसीबीच्या या कारवाईचा मोठा फटका डी गँगला पडला आहे.

mumbai crime news d gang biggest action by NCB brother of dawood ibrahim under arrest

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com