मुंबई : डिलिव्हरी बॉयकडून महिलेचा विनयभंग; आरोपी अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

मुंबईतील खार भागात कोरियन युट्यूबरच्या विनयभंगाच्या घटनेनंतर आणखी एका महिलेसोबत विनयभंगाची घटना समोर आली.

Crime News : मुंबई : डिलिव्हरी बॉयकडून महिलेचा विनयभंग; आरोपी अटकेत

मुंबई - मुंबईतील खार भागात कोरियन युट्यूबरच्या विनयभंगाच्या घटनेनंतर आणखी एका महिलेसोबत विनयभंगाची घटना समोर आली आहे. यावेळी आरोप डिलिव्हरी बॉयवर आहे. आरोपी डिलिव्हरी बॉय 30 नोव्हेंबर रोजी डिलिव्हरी देण्यासाठी पीडितेच्या घरी गेला असता तिचा विनयभंग केला. शहजादे शेख असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम 354 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 नोव्हेंबर रोजी शहजादे शेख नावाचा डिलिव्हरी बॉय पार्सल देताना महिलेचा व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. तेव्हा महिलेने त्याच्या या कृत्याला विरोध केला. महिलेच्या विरोधामुळे चिडून आरोपीने पीडितेच्या घरात घुसून तिला मारहाण करण्याचा प्रयत्न केला आणि अपशब्द वापरण्यास सुरुवात केली.

पिडीत महिलेने मदतीसाठी आवाज उठवला आणि महिलेचा आवाज ऐकताच इमारतीचे सुरक्षा कर्मचारी मदतीला आले. याप्रकरणी पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. आरोपी डिलिव्हरी बॉयला वांद्रे न्यायालयात हजर करण्यात आले. त्याचवेळी या घटनेनंतर पीडित महिला भयभीत झाली आहे.

विशेष म्हणजे अलीकडेच मुंबईतील खार परिसरात कोरियन युट्यूबरचा विनयभंग झाल्याची घटना घडली होती. पीडित कोरियन महिला घटनेच्या वेळी लाईव्ह स्ट्रीमिंग करत होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर आगीसारखा पसरला. यानंतर मुंबई पोलिसांनी विनयभंग करणाऱ्या मुलांना अटक केली. ही घटना मुंबईतील खार भागातही घडली आहे.