Mumbai : पिडीत पतीचे पोलिसांनी वाचवले प्राण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

Mumbai : पिडीत पतीचे पोलिसांनी वाचवले प्राण...

मुंबई : मुंबईत पत्नीशी भांडण झाल्यावर आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्याऱ्या पतीचे प्राण वेळेत वाचवण्यात पोलिसांना यश आले आहे . मुंबईतील विक्रोळी परिसरातील रहिवासी वस्तीत मंगळवारी पहाटे एका इसमाने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. परंतु मुंबई पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपाने 30 वर्षीय व्यक्तीचे प्राण वाचले.

तत्पूर्वी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पतीचे त्याच्या पत्नीशी जोरदार भांडण सुरू होते. कंटाळून भांडणाची जोडप्याच्या शेजारीनी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करत माहिती दिली. स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घरातून पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण सुरू असल्याचे समजले आणि पोलिस घरात दाखल होताच त्यांना पिडीत साडीने गळफास घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसले.

तातडीने कारवाई करत पोलिसांनी ताबडतोब गळफासातून पिडीत व्यक्तीला सोडवले आणि त्याला तात्काळ अॅम्ब्युलन्सने राजावाडी रुग्णालयात नेले. सुदैवाने त्या व्यक्तीचे प्राण थोडक्यात बचावले.

" पत्नीशी भांडण झाल्यावर त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसाना पाच मिनिटे उशीर झाला असता तर त्याचा मृत्यू झाला असता, पुढील तपास सुरू आहे "

दिपक लहाने , कॉन्स्टेबल ( पिडीत व्यक्तीचे प्राण वाचवणारे)