
Mumbai Crime News : लोहमार्ग पोलिसांनी चोराच्या मुसक्या आवळल्या
मुंबई : पश्चिम रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकात एका चोरट्याला गुन्हे प्रतिबंधक पथकाने रंगेहात चोरी करताना पकडण्यात आले आहे. अनिल काळे असे आरोपीचे नाव असून तो दादर पूर्व येथील रहिवासी आहे. यापूर्वी आरोपीवर तीन गुन्हे दाखल आहे.
लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादर पश्चिम रेल्वे स्थानकाच्या फलाट क्र ३ वर गुन्हे प्रतिबंधक पथक गस्त करीत असताना प्रवाशांच्या गर्दीत एक इसम एका महिलेच्या पर्सची चैन खोलून चोरी करण्याच्या इराद्याने आतील समान चाचपत असल्याचे दिसले. त्या चोराला महिला सुरक्षा पथकातील अंमलदार त्याला पहात असल्याचे दिसताच तो पळून जाऊ लागला.
त्यावेळी महिला अंमलदार यांनी त्याचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले. अनिल काळे असे आरोपीचे नाव असून तो दादर पूर्व येथील रहिवासी आहे. त्या यापूर्वी तीन गुन्हे दाखल आहेत. गुन्हा दाखल करण्यात आरोपीस पुढील कायदेशीर कारवाईसाठी मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.