
आरोपी भोंदूबाबने या महिलेला तिच्यात घरात अंधार करून, मंत्र तंत्राचा वापर करून, खोट्या नोटांचा पाऊस पाडून दाखवला होता
मुंबई, ता. 21 : पैशांचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली नागपाड्यातील 82 वर्षीय वृद्ध महिलेची भोंदूबाबाने लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. भोंदू बाबाकडून वारंवार पैशांची मागणी केली जात होती. मात्र ज्यावेळी वृद्धाकडचे सगळे पैसे आणि दागिने संपले त्यावेळी तिने मुलींकडे पैशांची मागणी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
नागपाडा परिसरात एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या 82 वर्षीय वृद्ध महिलेची 2019 मध्ये एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान ओळख झाली होती. त्यानंतर या भामट्यांनी वयोवृद्ध महिलेला पैशांचे आमीष दाखवून आपल्या जाळ्यात ओढलं. मागील दोन वर्षांपासून या भोंदू बाबांनी वेळोवेळी फसवणूक करत होते.
महत्त्वाची बातमी : डी गँगच्या ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश! NCB कडून धक्कादायक गोष्टी जप्त
तीस वर्षीय हनिफ मोहम्मद शेख, अठ्ठावीस वर्षीय इम्रान मोहम्मद सय्यद असं या भोंदूबाबांची नावे आहेत. हे दोघेही मालाडच्या मालवणी परिसरातली राहणारे आहेत. भोंदूबाबानं वारंवार महिलेकडून पैसे आणि दागिन्यांची मागणी करत पैशांचा पाऊस पाडून देतो असं आमिष दाखवलं होतं. पैशांचा पाऊस पाहण्याच्या नादात त्या महिलेने तिच्याकडेचे सगळे दागिने विकून पैसा जमा केला आणि ते पैसे या भोंदू बाबाला देऊ केले.
मात्र पैशाची भूक न मिटलेल्या या भोंदूबाबाकडून वारंवार पैशांची मागणी होतच होती. गेल्या दोन वर्षात या भोंदूबाबाने या वृद्ध महिलेकडून तब्बल 39 लाखांचा मुद्देमाल घेतल्याचं तपासामध्ये उघडकीस आले आहे.
महत्त्वाची बातमी : मुलांनो अभ्यासाला लागा, दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा झाल्यात जाहीर
आरोपी भोंदूबाबने या महिलेला तिच्यात घरात अंधार करून, मंत्र तंत्राचा वापर करून, खोट्या नोटांचा पाऊस पाडून दाखवला होता. तसेच त्या खोट्या नोटा तिच्याच कपाटात ठेवून त्याची माहिती कुणाला न देण्याचे सांगितले. तसे केल्यास तिचे नुकसान होईल, तिच्या मुलींच्या आयुष्यात अनेक विघ्न येतील अशी भिती दाखवली होती.
महिलेकडचे सर्व पैसे संपल्यानंतरही आणखी पैसे हवे असल्यास 5 लाख द्यावे लागतील, अशी मागणी केली होती. मात्र वेळीच पीडित महिलेच्या मुलीने या सगळ्याची माहिती घेतली असता पैशांचा पाऊस म्हणून पाडलेल्या नोटा लहान मुलांच्या खेळण्यातील असल्याचं समोर आल्याने या भोंदूबाबाचा भांडाफोड झाला आहे.
मुंबईतील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा । Crime Marathi News from Mumbai
mumbai crime news man duped old women of nagpada by giving fake promise of rain of money