Mumbai Crime : धक्कादायक! प्रेयसीच्या मदतीने पोलिसाचा विवाहितेवर बलात्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

assault
Mumbai Crime : धक्कादायक! प्रेयसीच्या मदतीने पोलिसाचा विवाहितेवर बलात्कार

Mumbai Crime : धक्कादायक! प्रेयसीच्या मदतीने पोलिसाचा विवाहितेवर बलात्कार

नालासोपाऱ्यात प्रेयसीच्या मदतीने एका पोलिसाने दारू पाजून विवाहित महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलीस आणि त्याच्या प्रेयसीविरोधात नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकारामुळे पोलीस वर्तुळात खळबळ माजली आहे.

राहुल लोंढे आणि प्रिया उपाध्याय असे बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नाव आहे. राहुल लोंढे हा वसई पोलीस ठाण्यात पोलीस नाइक पदावर कार्यरत आहे. तर प्रिया उपाध्याय ही त्याची प्रेयसी आहे.

हेही वाचा: Mumbai Crime: रॉकेटचा बॉक्स हातात घेत मध्यरात्री तरुणाची स्टंटबाजी

राहुल लोंढे त्याची प्रेयसी प्रिया उपाध्याय यांनी संगनमत करून, 31 वर्षीय विवाहित महिलेला नालासोपारा येथील प्रेयसीच्या घरी बोलावून, त्याठिकाणी तिला दारू पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडित महिलेने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केला आहे. तसेच कुणाला सांगितले तर जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत. पीडित महिलेने हा संपूर्ण प्रकार आपल्या पतीला सांगितल्यावर त्याने ऑनलाइन ई-मेलद्वारे मुख्यमंत्री, मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालय यांना तक्रार दाखल केल्या नंतर, 18 ऑक्टोबरला नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सध्या दोन्ही आरोपी फरार आहेत.

हेही वाचा: Pune Crime : धक्कादायक! लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच मुलाची सख्ख्या आईला अमानुष मारहाण

हाच पोलीस आरोपी आणि त्याची प्रेयसी या दोघांचे वेगवेगळे दोन व्हिडीओही समोर आले असून, एका व्हिडीओमध्ये पार्टीत दारू पिऊन धिंगाणा करताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये प्रेयसी ही बंद दाराआड दारूच्या नशेत नाचताना दिसतेय तर बाजूला दारूचे ग्लास भरलेले दिसत आहेत.