Mumbai Crime: रॉकेटचा बॉक्स हातात घेत मध्यरात्री तरुणाची स्टंटबाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

Mumbai Crime: रॉकेटचा बॉक्स हातात घेत मध्यरात्री तरुणाची स्टंटबाजी

डोंबिवली : हातात रॉकेटचा बॉक्स घेत फटाक्यांची स्टंटबाजी डोंबिवली मध्ये एका तरुणाने केली आहे. या तरुणाचा व्हिडीओ समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल होत आहे. उल्हासनगर मध्ये काही दिवसांपूर्वी अशीच स्टंटबाजी एका तरुणाने मध्यरात्री करत इमारतीवर हे रॉकेट सोडले होते. उल्हासनगर मधील तरुणाविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर डोंबिवली मधील तरुणावर देखील कारवाई होते का हे पहावे लागेल.

(Mumbai Crime News Updates)

उल्हासनगर मध्ये रविवारी मध्यरात्री एका तरुणाने रॉकेटचा बॉक्स हातात धरून रॉकेट इमारतीच्या दिशेने सोडले. याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला होता. रॉकेट इमारतीवर सोडल्याने, मोठी दुर्घटना घडली असती. सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र रॉकेट इमारतीवर सोडल्याने एकच खळबळ उडाली होती.

हेही वाचा: Satara Earthquake: साताऱ्यातील कोयना धरण परिसरात भूकंपाचे धक्के

याची दखल घेत उल्हासनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. याच घटनेची पुनरावृत्ती डोंबिवली मध्ये झाल्याचे पहायला मिळत आहे. डोंबिवली मधील पाथर्ली मधील एका तरुणाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक तरुणाने हातात रॉकेटचा बॉक्स घेऊन स्टंट करत हवेत फटाके उडवले असल्याचे दिसून येत आहे.

फटाके फोडताना तरुण स्टंटबाजी करण्याच्या घटना घडत असून यामुळे मोठी हानी होऊ शकते. उल्हासनगर मध्ये तरुणावरती कारवाई केल्यानंतर आता डोंबिवलीतल्या या तरुणावरती पोलीस काय कारवाई करते हे पहावे लागेल.

टॅग्स :crimeMumbaiDiwali