Therapist Beating Woman In Wadala
ESakal
मुंबई
Viral: मुंबईत धक्कादायक घटना! बुकिंग रद्द केली, थेरपिस्टचा संताप उफाळला; थेट महिला ग्राहकाला मारहाण अन्... व्हिडिओ व्हायरल
Therapist Beating Woman In Wadala: मुंबईच्या वडाळा परिसरात अर्बन कंपनीच्या मसाज थेरपिस्टकडून महिलेवर मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुंबईतील वडाळा परिसरात झालेल्या एका धक्कादायक घटनेने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. अर्बन कंपनी अॅपद्वारे नियुक्त केलेल्या एका महिला मसाज थेरपिस्टने बुकिंग रद्द झाल्यानंतर एका महिला क्लायंटला मारहाण केल्याचा आरोप आहे. पीडितेने पोलीस तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेनंतर अर्बन कंपनीने महिला मसाज थेरपिस्टला कामावरून काढून टाकले आहे.

