
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिला पायलटसोबत चालत्या कॅबमध्ये दोन नराधमांनी अतिप्रसंग करण्याच प्रयत्न केला पण नाकाबंदीमुळे या पुढील बाका प्रसंग टळला. महिलेने कॅब बुक केल्यानंतर चालकाने रस्ता बदलून गाडीत दोन अज्ञात व्यक्तींना बसवलं आणि त्या दोघांनी महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांची नाकाबंदी पाहून आरोपी पळून गेले. हा धक्कादायक प्रकार घाटकोपरमध्ये घडला.