esakal | लॉकडाऊन शिथील झालं रे झालं; मुंबईत गुन्हेगारीचं प्रमाणही वाढलं! वाचा बातमी
sakal

बोलून बातमी शोधा

लॉकडाऊन शिथील झालं रे झालं;  मुंबईत गुन्हेगारीचं प्रमाणही वाढलं! वाचा बातमी

मे महिन्यात लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील केल्यानं या महिन्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे.

लॉकडाऊन शिथील झालं रे झालं; मुंबईत गुन्हेगारीचं प्रमाणही वाढलं! वाचा बातमी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. मात्र लॉकडाऊनच्या काळात गुन्हेगारीचं प्रमाण वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लॉकडाऊन असल्यामुळे एप्रिल महिन्यात गुन्हेगारीचं प्रमाण घटलं होतं. पण मे महिन्यात लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील केल्यानं या महिन्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. शहरात हळूहळू लॉकडाऊनवरील निर्बंध कमी करत असल्यानं गुन्हेगारीतही सातत्याने वाढ होत आहे. यात जास्तकरुन शरीरांवर होणारे गुन्हे जास्त आहे.

ऑनलाईन शिक्षणामुळे शैक्षणिक शुल्क कमी होणार? शिक्षणमंत्र्यांनी ही दिली माहिती

लोकांना बाहेर फिरण्याची परवानगी नसताना, शहरातल्या 94 पोलिस स्टेशनमध्ये कमी प्रमाणात विविध गुन्ह्यांची नोंद झाली. एप्रिलमध्ये एकही सोनसाखळी चोरण्याची घटना घडली नव्हती. मार्च महिन्यात 14 तर मे महिन्यात दोन प्रकरणांची नोंद करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यानं दिली. एप्रिल महिन्यात घरफोडी, मोटार वाहने आणि इतर मौल्यवान वस्तू चोरीच्या घटना निम्म्याहून कमी झाल्या, असे या अधिकाऱ्यानं सांगितले.

काय सांगता! नवरदेव थेट पीपीई कीट घालून बोहल्यावर, कुठे झालाय हा विवाह

दरम्यान, एप्रिलमध्ये आठ जणांची तर मे महिन्यात 10 जणांची हत्या झाल्याची नोंद झाली आहे. याव्यतिरिक्त एप्रिलमध्ये मारहाण आणि दुखापत होण्याच्या 134 घटना घडल्या आणि मे महिन्यात त्यात वाढ होऊन 252 झाल्या. मोटार वाहन चोरीच्या घटना एप्रिलमध्ये 84 होत्या त्यात वाढ होऊन मे महिन्यात आकडा 188 वर गेला. चोरीच्या घटनांमध्येही वाढ झाली. एप्रिलमध्ये आकडा 34 होता तो मे महिन्यात 51 झाला आहे. 

मुंबईतील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

घरफोडीचं प्रमाण कमी 

एप्रिल आणि मे हे दोन महिने घरफोडीच्या गुन्ह्यासाठी कुप्रसिद्ध आहेत. कारण या काळात बरीच कुटुंबं आपल्या गावी जात असतात. त्यामुळे चोरट्यांनी चोरी करण्याची संधी मिळत असते. यावर्षी लॉकडाऊनमुळे निश्चितच प्रतिबंध आले. यावर्षी एप्रिल महिन्यात 66 घरफोडीच्या घटना घडल्या.  2019 आणि 2018 मध्ये याच महिन्यात ही संख्या अनुक्रमे 146 आणि 169 होती, अशी माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यानं दिली. यावर्षी मे महिन्यात घरफोडीची 49 प्रकरणाची नोंद झाली. 2019 आणि 2018 मध्ये याच महिन्यात संख्या 161 आणि 165 होती, अशी माहिती अधिकाऱ्यानं दिली. 

गुन्हेगारीचा आकडा 

हत्या: जाने (10) फेब्रु (10) मार्च (12) एप्रिल (8) मे(10)

हत्येचा प्रयत्नः जाने (34) जाने (30) मार्च (27) एप्रिल (11) मे( (19)

चेन स्नॅचिंग: जाने (9) जाने (11) मार्च (14) एप्रिल  (0)  मे (2)

घरफोडीः जाने (191) फेब्रुवारी (142) मार्च (110) एप्रिल (66) मे (49)

मोटार वाहन चोरी: जाने (215) फेब्रुवारी (223) मार्च (193) एप्रिल (84) मे (158)

चोरी: जाने (514) फेब्रुवारी (483) मार्च (301) एप्रिल (34) मे (51)

loading image