Mumbai Crime : डेटा चोरून प्रतिस्पर्ध्याला विकला, चार कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा

Data Sharing Crime: अचानक घडलेल्या या संशयास्पद घडामोडींमुळे कंपनीने चौकशी सुरू केली.
Mumbai Crime : डेटा चोरून प्रतिस्पर्ध्याला विकला, चार कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा
Updated on

Online Crime: मुंबई - रियल इस्टेट क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीची महत्वाची, संवेदनशील वीदा(डेटा) चोरून प्रतिस्पर्धी कंपनीला विकल्याची तक्रार वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तक्रारदार कंपनीत काम करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार कंपनी शहरात गृह खरेदी, विक्री, भाडेतत्त्वावर मालमत्ता मिळवून देणे आदी व्यवहारांसाठी ग्राहकांना ऑनलाईन सेवा पुरवते. गृह खरेदी - विक्रीसाठी इच्छुक ग्राहकांचा डेटा मिळवण्यासाठी कंपनी वर्षाला सुमारे ८० लाख रुपये खर्च करते.

Mumbai Crime : डेटा चोरून प्रतिस्पर्ध्याला विकला, चार कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा
Jalgaon Crime News : कापूस चोरी पचवून टाकला दरोडा; दरोडेखोरांची कबुली

या कंपनीच्या विभागीय व्यवस्थापकाने मे महिन्यात अचानक राजीनामा दिला. त्यासोबत त्याच्या दोन सहकाऱ्यांनीही पगार घेऊन नोकरी सोडली. तर अन्य एक कर्मचारी १५ मे पासून बेपत्ता होता. अचानक घडलेल्या या संशयास्पद घडामोडींमुळे कंपनीने चौकशी सुरू केली.

विभागीय व्यवस्थापकाने प्रतिस्पर्धी कंपनीत नोकरी पत्करल्याची बाब समोर आली. तसेच नोकरी सोडून गेलेले कर्मचारी अन्य कर्मचाऱ्यांना भडकावून, लाच देण्याचा प्रयत्न करून ग्राहकांचा डेटा चोरी करण्यास सांगत होते.

Mumbai Crime : डेटा चोरून प्रतिस्पर्ध्याला विकला, चार कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा
Thane Ulhasnagar Crime: वाढदिवशी पार्टीमध्ये दारू कमी पडली! 'बर्थ डे बॉय'ला 3 मित्रांनी चौथ्या मजल्यावरून फेकलं

ही बाब समजताच कंपनीने आपल्या गुगल ड्राईव्हवर चाचपणी केली असता नोकरी सोडलेल्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकांचा महत्त्वाचा, व्यवसायिक दृष्ट्या संवेदनशील डेटा ऑफलाईन डाऊनलोड करून चोरला आणि प्रतिस्पर्धी कंपनीला विकला, ही बाब उघड झाली. त्याजोरावरच प्रतिस्पर्धी कंपनी संबंधित विभागात उत्तम कामगिरी करू शकली. त्यामुळे तक्रारदार कंपनीला मोठे नुकसान झाले, असा आरोप तक्रारीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.