Mumbai Crime: शिक्षिकेने पालकांना केली तक्रार; 12 वर्षाच्या मुलाने घरातून काढला पळ

पालकांच्या तक्रारीतून घर सोडून गेलेला मुलगा सापडला
Crime
Crimesakal

Mumbai Crime: शिक्षिकेने पालकांशी तक्रार केल्यामुळे भीतीने घरातून पळून जाणाऱ्या मुलाला पोलिसांनी 24 तासांत शोधण्यात यश मिळाले आहे. दादरमधील नायगाव परिसरात एका 12 वर्षाच्या मुलाने शाळेतील शिक्षकांनी त्याला अभ्यासाच्या कारणास्तव फटकारल्यानंतर अचानक घर सोडून गेला.मुलगा बेपत्ता झाल्यामुळे मुलाच्या पालकांनी स्थानिक भोईवाडा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. गुन्ह्याची नोंद करून भोईवाडा पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या अवधीत मुलाला शोधून काढले.

शुक्रवारी शाळेच्या वेळेत वर्गात मुलाने खोड्या केल्या होता. या संदर्भात त्याच्या वर्गशिक्षकाने मुलाच्या पालकांना फोन करून याबाबत माहिती दिली. दुपारच्या सुमारास, त्याचे आईवडील घरी नसताना मुलगा घरी परतला. त्यांनतर दुपारी 12:40 च्या सुमारास, तो त्याच्या राहत्या इमारतीतून बाहेर पडला.संध्याकाळी त्याचे आई-वडील घरी परतल्यावर त्यांनी मुलाचा शोध सुरू केला . तसेच रात्रीपर्यंत मुलगा परत येण्याची वाट पाहू लागले. आली.

Crime
Navi Mumbai Crime: पत्नीच्या चेहऱयावर ऍसिड टाकून फरार झालेल्या पतीचा पोलिसांकडून शोध सुरू

मात्र तो न आल्याने रात्री 8.40 च्या सुमारास त्यांनी भोईवाडा पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. मुलगा अल्पवयीन असल्याने पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला . तसेच कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वीच मुलाला शोधण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात

पोलीस तपास

पोलीस पथकानी आजूबाजूची मोकळी मैदाने, बागा सार्वजनिक ठिकाणांची तपासणी सुरू केली, पण मुलगा कुठेच सापडला नाही. त्यानंतर किमान 25 ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलीसांकडून स्कॅन केले गेले. शेवटी हा मुलगा प्रभादेवी रेल्वे स्टेशनकडे जाताना दिसला. त्यानंतर पोलिसांनी रेल्वेचे सीसीटीव्ही तपासले आणि मुलगा विरार लोकल ट्रेनमधून दादर रेल्वे स्थानकावर उतरताना दिसला.पोलिस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने मुलाचा माग काढत होते. दादरच्या फुलबाजार परिसरात मुलगा पोहोचला. पोलिसांनी स्थानिक रस्त्यालगतच्या 15 दुकानांचे सीसीटिव्ही फुटेज तपासल्यानंतर त्यांना हा मुलगा दादर पश्चिम येथील रानडे रोडवर असलेल्या सुविधा नावाच्या कपड्याच्या दुकानाबाहेर बसलेला दिसला. स्थानिक पोलीस पथकाने संबंधित ठिकाणी पोहोचून मुलाला भेटले. त्यानंतर पालकांशी संपर्क साधत मुलाला त्यांच्या ताब्यात देण्यात आले

Crime
Mumbai Crime: त्या ५ मुलींचा दिल्लीत लागला शोध; आई-वडीलांना कंटाळुन सोडल होत घर

घटनेचे कारण

शाळेतील शिक्षकांनी पालकांकडे तक्रार केल्यामुळे मुलाला पालकांना सामोरे जाण्याची भीती वाटत होती, म्हणून भीतीने त्याने घर सोडण्याचा निर्णय घेतल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. सध्या आई-वडिलांकडे सुखरूप घरी परतल्यानंतर तीन दिवस मुलाचे समुपदेशन सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Crime
Navi Mumbai Crime: घरफोडी करणाऱया सराईत दुक्कलीला पोलिसांनी केली अटक!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com