मुंबई : खोटी बातमी व्हायरल करणाऱ्या पत्रकाराला अटक | Mumbai crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fake-news

मुंबई : खोटी बातमी व्हायरल करणाऱ्या पत्रकाराला अटक

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : एक महिला आणि तिची मैत्रिण देहविक्रीचा (Prostitute) व्यवसाय करते असं एका मित्रानं सांगितल्यावर एका पत्रकारानं (journalist) त्यातल्या एका महिलेसंबंधी एक व्हिडिओ बनवला (video creation) आणि तो सोशल मीडियावर (social media) अपलोड करुन व्हायरल (viral video) केला होता, या पत्रकाराला मुंबईच्या विनोबा भावे नगर पोलिसांनी अकट (journalist arrested) केलीय.

हेही वाचा: मिरा-भाईंदर, वसई-विरार परिसरात ड्रोनवर बंदी

यातील आरोपी साजीद अली कुरेशी यानं त्याचा पत्रकार मित्र अफजल सुरज शेख याला सांगितलं की कुर्ला इथं कपड्यांच्या व्यवसाय करणाऱ्या दोन महिला या वेश्या व्यवसाय करतात, त्याच्या सांगण्यावरुन अफजल शेखनं त्यातल्या एका महिलेच्या संबंधित एक व्हिडिओ बनवला, ज्यात त्या महिलेची खोट्या गोष्टी सांगून बदनामी करण्यात आली होती. त्यानंतर त्यानं तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून व्हायरल केला. त्या महिलेला जेव्हा याबाबत समजलं तेव्हा तिनं विनोबा भावे नगर पोलिस स्टेशनला धाव घेतली आणि संबंधित पत्रकाराविरोधात तक्रार दाखल केली.

विनोबा भावे पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक सपकाळे यांनी त्या व्हिडीओची सत्यता पडताळून पाहीली, तेव्हा त्या महिलेची तक्रार खरी असल्याचं पोलिसांना समजलं, पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला, आणि अफजल सुरज शेख याला अटक केली आणि साजिद कुरेशीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्याच्या चोकशीनंतर त्याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचं सिद्ध झाल्यावर साजीदखानलाही अटक करण्यात आली. दोघामवरही भा द वि कलम 354(D) 500,509,34 तसंच माहीती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर प्रकरणातला एक आरोपी अजून फरार आहे. अजर शेख असं त्त्याचं नाव आहे. त्याचा पोलिस तपास करत आहेत.

loading image
go to top