esakal | मुंबई : अमित भट टोळी विरुद्ध तडीपारीची कारवाई | Mumbai Crime
sakal

बोलून बातमी शोधा

criminals

मुंबई : अमित भट टोळी विरुद्ध तडीपारीची कारवाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चेंबूर : मुंबईतील विविध पोलिस ठाण्यांत (police station) ३७ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल (police cases) असलेल्या टोळीप्रमुख अमित वरदराज भट (Amit bhat) आणि त्याच्या साथीदारां विरोधात गोवंडी पोलिसांनी (Govandi police) तडीपारीची कारवाई केली आहे. अमित भट व त्याच्या साथीदारांनी (Fugitive criminal) मुंबई शहर व उपनगरांत धुडगूस घातला होता.

हेही वाचा: माथेरान मधील शाळा 4 ऑक्टोबर पासून सुरू; शिक्षक पालक सभेत निर्णय

भट टोळीचा मोरक्या अमित भट व त्याच्या पाच साथीदारांनी गोवंडी, चेंबूर, आरसीएफ, सायन, ॲण्टॉप हिल, ना. म. जोशी मार्ग, आग्रीपाडा पोलिस ठाण्यात ३७ हून अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. या टोळीविरुद्ध तडीपारीचा प्रस्ताव परिमंडळ सहाचे उपायुक्त कृष्णकांत उपाध्यय यांच्याकडे गोवंडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाळासाहेब केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला होता.

पोलीस उपायुक्तांनी भट टोळीचा प्रमुख अमित वरदराज भट व त्याचे साथीदार विकास ऊर्फ बकरी हनुमंत राऊत, शिवा हिरालाल गुप्ता, दिनेश संतोष शिवगण, जावेद करम हुसेन शेख, अमन फारुख शेख यांना तडीपारीचे आदेश दिले. दरम्यान, गोवंडी पोलिसांनी २०२१ मध्ये आतापर्यंत नऊ टोळ्यांच्या ३५ साथीदारांविरोधात एकूण ८० गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केली.

loading image
go to top