Mumbai : पश्चिम रेल्वेच्या 'एएसआरएस स्टोर'वर सायबर अटॅक हॅकरने मागितली खंडणी

दक्षता विभाग आणि आरपीएफ पोलिसाकडून परळ कारशेडमध्ये छापे
Mumbai
Mumbai esakal

मुंबई : लोअर परळ कारशेडमधील ऑटोमेटिक स्टोरेज रिट्राइवल सिस्टमवर (एएसआरएस) सायबर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. सायबर हॅकर्सनी ही सिस्टीम पूर्ववत करण्यासाठी रेल्वेकडून काही पैशांची मागणी केल्याची माहिती समोर येत आहे.त्यामुळे झोपी गेलेल्या पश्चिम रेल्वेची सुरक्षा यंत्रणा जागी झाली असून सोमवारी सकाळी दक्षता विभाग, आरपीएफ आणि पोलिसांकडून लोअर परळ कारशेडमध्ये छापे टाकले आहेत.

Mumbai
Parenting Tips: या Vitamin च्या कमतरतेमुळं मुलांची स्मरणशक्ती होते कमकुवत, पालकांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात

१४० वर्षांपेक्षा जुना असलेल्या पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ वर्कशॉपची खाती संपूर्ण भारतीय रेल्वेत आहे. या वर्कशॉपमध्ये मेल-एक्सप्रेस रेल्वे गाड्या दुरुस्ती करण्यात येते. डिझेल इंजिनचे ओव्हरऑयलिंग करणारा विभाग, क्रेनचे ओव्हरऑयलिंग करणारा विभाग, व्हिल शॉप, फिटिंग शॉप, टूल शॉप, कोच रिपेअर शॉप, मशिन शॉप, वेल्डिंग शॉप, स्मिथी शॉप, ट्रॅक्शन मशिन्स रिपेअर शॉप आणि सी अ‍ॅण्ड एम लॅब असे एकूण २६ विभाग या वर्कशॉप अंतर्गत येतात.

Mumbai
Parenting Tips: या Vitamin च्या कमतरतेमुळं मुलांची स्मरणशक्ती होते कमकुवत, पालकांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात

प्रत्येक विभागाला दररोज गाड्या दुरुस्तीसाठी सुटे भाग लागतात. या सर्व विभागांना नट, बोल्टसारखे सुटे भाग आणि दुरुस्तीचे साहित्य उपलब्ध करून देण्याचे काम लोअर परळ वर्कशॉपमधील स्टोर विभागाकडे असते. आतापर्यंत मॅन्युअल पध्दतीने प्रत्येक विभागाला सुट्टे भाग आणि साहित्य दिले जात होते. मात्र,यामध्ये पारदर्शकता यावी तसेच स्टोर विभागातील साहित्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी २०१९ पासून ऑटोमेटिक स्टोरेज रिट्राइवल यंत्रणा सुरू केली. या ऑनलाईन यंत्रणेमुळे सर्व विभागाला ऑनलाइन्स पद्धतीने ऑर्डर देऊन हे सुटे भाग मिळत होते. या करिता अत्याधुनिक स्टोरपण उभारण्यात आले होते. या सर्व यंत्रणा ऑनलाइन सुरु होत्या.

Mumbai
Career Tips: लहान मुलांच्या सहवासात राहायला आवडत असेल तर या क्षेत्रात करा करिअर

एएसआरएस सिस्टीम हॅक

बुधवारी ऑटोमेटिक स्टोरेज रिट्राइवल यंत्रणा (एएसआरएस) हॅक करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण यंत्रणा ठप्प पडली. विशेष म्हणजे यंत्रणा सुरु करण्यासाठी रेल्वेने प्रयत्न केला. परंतु,त्यात अपयश आले. परिणामी संबंधित विभागांना रेल्वेगाड्यासाठी सुटे भाग मिळाले नाही. त्यामुळे ऑफलाइन पद्धतीने हा काम करण्याची वेळ रेल्वेवर आली.

Mumbai
Travel Tips : ग्रुपसोबत ट्रीपला जाताना ‘या’ छोट्या-मोठ्या गोष्टी लक्षात ठेवा

हि यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी हॅकर्सनी लाखो रुपयांची मागणी केल्याची माहिती वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या सुत्रानी दिली आहे. या संदर्भात पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क विभागाला विचारले असता, याबद्दल आम्हाला काही माहिती नसल्याची माहिती सकाळशी बोलताना सांगितले .

Mumbai
Baby Care Tips : हिवाळ्यात बाळाची मालिश करण्यासाठी 'या' तेलांचा करा वापर, बाळ राहील तंदूरूस्त

वर्कशॉपमध्ये सखोल चौकशी ?

या घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेच्या दक्षता विभागाने चौकशी सुरु केली आहे. सोमवारी सकाळी दक्षता विभागाचे अधिकारी, रेल्वे सुरक्षा विभाग आणि लोहमार्ग पोलिसांनी वर्कशॉपमध्ये ऑटोमेटिक स्टोरेज रिट्राइवल सिस्टमच्या ट्रॉलीला भेट दिली. तसेच या ट्रॉली देखभाल दुरुस्ती करणाऱ्या रेल्वे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची दक्षता विभागातील अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी सुद्धा केली आहे.

भारतीय रेल्वेची पहिली सिस्टीम -

भारतीय रेल्वेतील पहिली स्वयंचलित स्टोरेज रिट्राइवल सिस्टम ही लोअर परळ वर्कशॉपमध्ये बसविली आहे. एएसआरएस सिस्टम हॅक झाल्याने अंदाजी २० माळ्याच्या ट्रॉलीमध्ये लाखों रुपयांचे अनेक सुट्टे भाग आणि रेल्वे साहित्य अडकून पडले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com