Mumbai Crime: मुलीचं नाव वापरून वेटरसोबत मैत्री; आई आजारी असल्याचे कारण सांगून पैसे उकळले, ११ लाखांचा गंडा अन्...
Cyber Crime: मुंबईतील एका वेटरची फेसबुकद्वारे ब्रिटिशमधील महिलेसोबत मैत्री झाली. मात्र हा सायबर भामट्यांनी रचलेला कट असून हनी ट्रॅपमध्ये गुंतवून वेटरला ११ लाखांचा गंडा घातला आहे.
मुंबई : हनी ट्रॅपमध्ये गुंतवून सायबर भामट्यांनी शिवाजी पार्क येथील इटालियन रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून नोकरी करणाऱ्या तरुणास ११ लाख रुपयांना फसवले. या प्रकरणी सायबर पोलिसांनी (मध्य विभाग) गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.