'आमच्याकडे ‘जिन’ आहे, तो सर्व इच्छा पूर्ण करतो' म्हणत तरुणीची फसवणूक, अडीच वर्षांत १६ लाख रुपयांनी घातला गंडा

Mumbai Cyber Fraud Case : अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने याप्रकरणी तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Mumbai Cyber Fraud Case

Mumbai Cyber Fraud Case

esakal

Updated on

मुंबईत २२ वर्षीय तरुणीची सुमारे १५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सायबर भामट्यांनी ‘जिन’च्या नावाखाली सर्व इच्छा पूर्ण करून देण्याचे आमिष दाखवत या तरुणीला गंडा घातला. विशेष म्हणजे हा प्रकार जवळपास अडीच वर्षे सुरू होता. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने याप्रकरणी तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com