मुंबईचे डबेवालेही होणार डिजिटल!

ऊर्मिला देठे
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

लवकरच वेबसाइट होणार सुरू; कॅशलेस व्यवहाराचा निर्धार
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला आणि देशभरात "डिजिटल इंडिया'ची लाट आली. मुंबईतील प्रसिद्ध डबेवालेही आता डिजिटल होत आहेत. जवळपास दीडशे वर्षे ऊन, पाऊस, पूर आणि अगदी दंगलीच्या दिवसांतही मुंबईतील लाखो नोकरदारांना घरचे जेवण पुरवणारे डबेवाले आता वेबसाइटद्वारे आपले कार्य करणार आहेत.

"कॅशलेस' व्यवहार करण्याचे डबेवाल्यांनी ठरवले आहे. त्यासाठी "डब्बावाला डॉट कॉम' ही वेबसाइट सुरू केली आहे. नागरिकांना त्यावर आपले नाव, मोबाईल क्रमांक आणि पत्ता नोंदवावा लागेल. सत्यतेच्या दृष्टीने पॅन कार्ड किंवा आधार कार्डचा यासाठी वापर करावा लागेल. यामुळे ऑनलाइन पेमेंट करता येईल, अशी माहिती डबेवाले किरण गवांदे यांनी दिली. मुंबईतील डबेवाल्यांनी "अनुपम टेक्‍नोलॉजीस'सोबत हे काम सुरू केले आहे. यापूर्वी नवीन ग्राहकांना आमच्यापर्यंत पोचण्यासाठी कष्ट घ्यावे लागत असत. आता या वेबसाइटमुळे नवीन ग्राहकांनाही फायदा होईल, असे गवांदे म्हणाले.

मुंबईत जवळपास पाच हजार डबेवाले असून, ते सुमारे दोन लाख ग्राहकांना आठवड्यातील सहा दिवस जेवणाचे डबे पोचवतात. आता अनुपम टेक्‍नोलॉजीससोबत त्यांनी करार केला असून, रेंटल ऍग्रिमेंटसाठी वेबसाइट सुरू करण्यात आली आहे. वेबसाइटवर कागदपत्रे सादर केल्यानंतर डबेवाला लॅपटॉप आणि बायोमेट्रिक मशिन घेऊन ग्राहकांच्या घरी जाऊन त्यांचे ठसे रजिस्टर करून घेतात. ग्राहकांना रेंटल ऍग्रिमेंटची माहिती दिल्यानंतर अन्य आवश्‍यक कागदपत्रे घेतली जातात. या प्रक्रियेला थोडा कालावधी लागत असला तरी हा कायमस्वरूपी तोडगा असल्याचे डबेवाला संघटनेचे म्हणणे आहे.

पेटीएमनेही पैसे भरणे शक्‍य
ऑनलाइन सुविधेसोबतच डबेवाल्यांचे पैसे पेटीएमनेही देता येतील. पेटीएम लॉग इन केल्यानंतर मोबाईल क्रमांक आणि ई-मेल व्हेरिफिकेशन झाल्यानंतर लगेच या सेवेचा फायदा घेता येईल. "डिजिटल इंडिया'त डबेवाल्याचा सहभाग असावा, यासाठी वेबसाईट किंवा पेटीएमचा पर्याय सुरू करण्यात आला आहे.

Web Title: mumbai dabevale digital