
मुंबई : वर्षभराची पाण्याची गरज भागवण्यासाठी आवश्यक असलेला पाणीसाठा यंदा मुबलक प्रमाणात जमा झाला आहे. बुधवारी (ता. १) सकाळी घेण्यात आलेल्या नोंदीनुसार मुंबईला पाणी पुरवणाऱ्या सात तलावांमध्ये एकूण १४ लाख २८ हजार ५४९ दशलक्ष लिटर (९८.७० टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. हा साठा ३५९ दिवसांसाठी पुरेसा असून, मुंबईकरांना पाणीकपातीशिवाय वर्षभर पुरवठा शक्य होणार आहे.