Mumbai Rain: मुंबईत दमदार पाऊस! धरणांत वर्षभर पुरणारा पाणीसाठा, तरीही १० टक्के पाणीकपातीचं संकट कायम; सध्याचा जलसाठा किती?

Mumbai Dam Water Level: मुंबईत पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडल्याने धरणांत वर्षभर पुरणारा पाणीसाठा तयार झाला आहे. सध्या हा साठा ८३.६८ टक्क्यांवर पोहोचला असून मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
Mumbai Dam Water Level

Mumbai Dam Water Level

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडल्याने धरणातील जलसाठ्यात वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत ६.०६ टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा २५ जुलैला ८३.६८ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरण क्षेत्रातील पावसामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com