

Mumbai Dam Water Level
ESakal
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख जलाशयांमधील पाणीसाठा ८९.४९ टक्क्यांवर पोहोचल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. समाधानकारक पाणीसाठा लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने शहरातील जलतरण तलावांचा बंद केलेला पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जलतरणपटू, क्रीडापटू आणि नागरिकांना दिलासा मिळाला आहे.