esakal | विमानसेवा बंद होण्यापूर्वी मुंबई-दिल्ली विमानाचं तिकीट कितीला विकलं गेलं माहितीये? वाचा...
sakal

बोलून बातमी शोधा

विमानसेवा बंद होण्यापूर्वी मुंबई-दिल्ली विमानाचं तिकीट कितीला विकलं गेलं माहितीये? वाचा...

रविवार आणि सोमवारी मुंबई ते दिल्ली १६०००, मुंबई ते कोची ११०००, मुंबई ते जयपूर ३१००० तर मुंबई ते हैदराबाद ८५०० असे तिकिटांचे दर होते. तर मंगळवारी हेच दर ३५०००-३६००० या घरात पोहोचले होते

विमानसेवा बंद होण्यापूर्वी मुंबई-दिल्ली विमानाचं तिकीट कितीला विकलं गेलं माहितीये? वाचा...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : भारतात कोरोनाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. भारतात ६०० च्या वर कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार २४ तारखेच्या रात्री सर्व देशांतर्गत विमानसेवा बंद करण्याचा निर्णयही सरकारनं घेतला आहे. त्यामुळे २४ मार्चला तिकिटांचे दर गगनाला भिडले होते.

केंद्र सरकारच्या आदेशानुसार सर्व कंपन्यांनी २५ मार्चपासून विमानसेवा बंद केली. मात्र त्याआधी २४ मार्चला विमान कंपन्यानी आपले काही विमानं रद्द केले होती. प्रवासी संख्या जास्त असल्यामुळे तिकिटांचे दर गगनाला भिडले होते. कोरोनाच्या भीतीमुळे अनेक नागरिक आपल्या आपल्या गावी परत जातायत.

मोठी बातमी : कोरोनामुळे लोकांना लागलीये एक चांगली सवय; वाचून व्हाल थक्क...

रविवार आणि सोमवारी मुंबई ते दिल्ली १६०००, मुंबई ते कोची ११०००, मुंबई ते जयपूर ३१००० तर मुंबई ते हैदराबाद ८५०० असे तिकिटांचे दर होते. तर मंगळवारी हेच दर ३५०००-३६००० या घरात पोहोचले होते. मंगळवारी मुंबई ते दिल्ली विमान तब्बल ३२ हजारांना विकलं गेलंय. विशेष म्हणजे तिकिटांचे दर इतके जास्त असूनही लोकं काही नागरिकांनी विमानाने प्रवास केलाय.

भारतात आंतरराष्ट्रीय विमानांना या आधीच बंदी घालण्यात आली आहे . मात्र देशांतर्गत विमानसेवा पहिल्यांदाच बंद करण्यात आली आहे. सरकारनं हा निर्णय घेतल्यानंतर विमानानं आपल्या घरी जाऊ इच्छिणाऱ्या लोकांची प्रचंड गर्दी विमानतळावर झाली होती. कोरोनाच्या भीतीमुळे अनेकजण मुंबईहून आपल्या मूळ गावी जात होते.

mumbai delhi flight ticket sold at thirty two thousand due to corona covid19 pandemic