Why are goat prices rising before Bakrid 2026?
esakal
मुंबई : ईद-उल-अझा (बकरी ईद) अवघ्या चार दिवसांवर आली असताना, आशियातील सर्वात मोठा पशुबाजार आणि कत्तलखाना असलेल्या मुंबईतील देवनार कत्तलखानामध्ये (Mumbai Bakra Eid goat price hike 2026) यंदा अत्यंत चिंताजनक चित्र पाहायला मिळत आहे. बाजारातील रिकाम्या गल्ल्या, चिंतेत असलेले खरेदीदार आणि गगनाला भिडलेले भाव यामुळे यंदाची ईद गेल्या काही दशकांतील सर्वात महागडी ठरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.