सरकारला दोन समाजात तेढ निर्माण करायची आहे का? धनंजय मुंडे

संजय शिंदे
सोमवार, 26 मार्च 2018

मुंबई : भीमाकोरेगाव प्रकरणाच्या दंगलीमधील आरोपी एकबोटे हे स्वत:हून अटक झाले. मात्र दुसरे आरोपी संभाजी भिडे यांना अटक करण्यात आली नाही याचा अर्थ सरकारला दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायची आहे का? असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला केला.

संभाजी भिडे यांना अटक होत नाही तोपर्यंत असे मोर्चे निघणार आहेत असे मुंडे बोलताना म्हणाले. तसेच सभागृहातील सर्व विषय बाजुला ठेवून भिडे यांच्या अटकेबाबत चर्चा व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

आज विधानपरिषदेमध्ये संभाजी भिडे यांना अटक का करण्यात आली नाही याविषयावर जोरदार चर्चा झाली. यावेळी सभागृहामध्ये आमदार भाई जगताप, आमदार कपिल पाटील, आमदार जोगेंद्र कवाडे यांनीही संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली.

Web Title: mumbai dhananjay munde government morcha sambhaji bhide