मुंबई : पोंढेपाडा येथील माता मृत्यूची जिल्हा शल्य चिकित्सकांकडून चौकशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hospital

मुंबई : पोंढेपाडा येथील माता मृत्यूची जिल्हा शल्य चिकित्सकांकडून चौकशी

मुंबई (विक्रमगड) : तालुक्यातील ओंदे पोढेंपाडा येथे राहणाऱ्या सुनिता सुर्वे यांच्या प्रसुती वेळी बाळाचा हात फॅक्चर झाला होता. हे बाळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करूनही आरोग्य विभागाने दुर्लक्ष केल्याने बाळाला उपचार वेळेत मिळाला नाही. तर या बाळाने प्रसुती वेळी आईच्या पोटात विष्टा केल्याची माहिती डॉक्टरांकडून समजली मात्र वेळीच उपचार न मिळाल्यामुळे बाळाच्या आईचा मृत्यू झाल्याचा आरोप भारताचा क्रांतिकारी मार्क्सवादी पक्षाकडून करण्यात आला आहे. तर भा. का. मा. प तालुका सचिव व माजी सभापती कमा टबाले यांनी केला आहे.

विक्रमगड तालुक्यातील ओंदे येथील करसोड येथे लग्न करून दिलेल्या परंतु ओंदे पोंढेपाडा येथे एका बागायत वाडी मध्ये काम करत असेलेल्या सुनिता नरेश सुर्वे ह्या गरोदर प्रसुती साठी विक्रमगड ग्रामीण रुग्णालय मध्ये 18 ऑक्टोबर 2021 मध्ये दाखल झाल्या होत्या प्रसुती वेळी यांच्या बाळाला खेचण्यात आले या वेळी बालकाच्या डाव्या हाताला दुखापत झाली व हात फॅक्चर झाला असल्याची तसेच बालकाने आईच्या पोटात विष्टा केली होती. यामुळे बालकाला व आईला पुढील उपचारासाठी जव्हार कुटीर रूग्णालय येथे हलवण्यात आले मात्र या बालकाच्या फॅक्चर हातावर उपचार करण्यात आला नाही. असा आरोप सुनिता सुर्वे यांच्या कुटुंबीयांनी केला होता.

या संदर्भात भारताचा क्रांतीकारी मार्क्सवादी पक्ष कार्यकर्ते यांनी पोलीस स्टेशन व आरोग्य विभागाशी संपर्क करून पुन्हा या बालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. बाळाच्या फॅक्चर हातावर उपचार झाला मात्र आईच्या पोटात बालकाने विष्टा केली होती. यावर योग्य उपचार न झाल्यामुळे नवजात बाळाची आई दगावली असल्याचा आरोप करीत संबंधित आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांवर कारवाई साठी भारताचा क्रांतिकारी मार्क्सवादी पक्षाकडून विक्रमगड तहसीलदार कार्यालयात शिष्टमंडळ आयोजीत करून कारवाई ची मागणी केली होती. त्यानुसार तहसीलदारांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.

हेही वाचा: "EDने वक्फ बोर्डाच्या 30 हजार संस्थांची चौकशी करावी"

या बैठकित ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिकाऱ्यांनी दोन्ही प्रकरणात चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यावेळी कामावर असलेल्या नर्स कडून खुलासा मागवण्यात आला असुन. चौकशी पुर्ण झाल्यावर दोषींवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन वैद्यकिय अधिकांनी दिले आहे. मातेचा मृत्यू घरी झाल्यामुळे त्याची प्राथमिक चौकशी तालुका वैद्यकिय अधिकाऱ्यां मार्फत करण्यात येईल. तसेच या प्रकरणी अंतिम चौकशी जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अध्यक्षतेखाली समिती कडून करण्यात येईल त्याचा अहवाल आल्या नंतर ही पुढील कारवाई करण्यात येईल असे ही आश्वासन या वेळी वैद्यकिय अधिकाऱ्यांनी दिले.

"आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणा पणामुळे नवजात बालकाचा हात फॅक्चर झाला. बालकाने आईच्या पोटात विष्टा केली होती, यावर आरोग्य विभागाने योग्य उपचार न केल्याने नवजात बाळाच्या आईच्या पोटात विष तयार झाले असावे. या मुळे या मातेचा मृत्यू झाला आहे. संबंधित आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन येईल."

-कमा टबाले (सचिव - भारताचा क्रांतिकारी मार्क्सवादी पक्ष)

loading image
go to top