esakal | Mumbai : मलिक, प्रसारमाध्यमांविरुद्ध मुंबै बँकेचा हजार कोटींचा दावा
sakal

बोलून बातमी शोधा

मलिक, प्रसारमाध्यमांविरुद्ध मुंबै बँकेचा हजार कोटींचा दावा

मलिक, प्रसारमाध्यमांविरुद्ध मुंबै बँकेचा हजार कोटींचा दावा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची प्रतिमा मलीन करणारी बेछूट विधाने केल्याचा आरोप करत मंत्री नवाब मलिक व त्यांना प्रसिद्धी देणाऱ्या प्रसारमाध्यमांविरुद्ध बँकेने एक हजार कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला आहे. बँकेचे सरव्यवस्थापक देवदास कदम यांनी याबाबत माहिती दिली.

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची उलाढाल दहा हजार कोटी रुपयांची आहे. राज्यातील ही एक प्रगत बँक आहे. अशा बँकेच्या लौकिकास काळिमा फासण्यासाठी वाटेल ती विधाने प्रसिद्ध केल्यामुळे अल्पसंख्याक विभागाचे मंत्री नवाब मलिक यांच्यासह काही प्रसारमाध्यमांविरोधात बँकेने दावा दाखल केल्याचे देवदास कदम यांनी सांगितले.

हेही वाचा: नांदेड : नद्यांकाठच्या गावांना विसर्गामुळे सतर्कतेचे आवाहन

सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी झाली. सभेमध्ये मुंबै बँकेच्या होणाऱ्या बदनामी संदर्भात सभासदांनी चिंता व्यक्त केली. मुंबै जिल्हा बॅंकेची बदनामी करणाऱ्या संबंधितांच्या विरोधात कारवाई करण्याचा ठराव वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमुखाने संमत करण्यात आल्याची माहितीही देवदास कदम यांनी दिली.

loading image
go to top