प्रभारींच्या खांद्यावरील भार केला कमी; अखेर मुंबई विभागाला मिळाले पुर्णवेळ उपसंचालक

प्रभारींच्या खांद्यावरील भार केला कमी; अखेर मुंबई विभागाला मिळाले पुर्णवेळ उपसंचालक
Updated on

मुंबई, ता. 17 : अनेक वर्षांपासून शिक्षण विभागातील शिक्षण उपसंचालक पदांच्या नियुक्‍त्या रखडल्या होत्या. यामुळे शिक्षण क्षेत्रातून असंतोष व्यक्त करण्यात येत असे. मुंबई शिक्षण विभागाच्या उपसंचालक पदी अनेक वर्षांपासून प्रभारी होते. अखेर या पदावर शिक्षण विभागाने पूर्ण वेळ उपसंचालकांची नेमणूक केली आहे. यामुळे प्रभारींच्या खांद्यावर असणारा भार कमी झाला असून पुणे, मुंबई, औरंगाबाद विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाला आता कायमस्वरुपी उपसंचालक मिळाले आहेत.

राज्यातील नऊ विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील बहुतांश कार्यालयाचा कार्यभार अनेक वर्षे प्रभारी उपशिक्षण संचालकांच्या खांद्यावर सोपवण्यात आला होता. मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकाचा पदभार अनेक वर्षे शिक्षण निरीक्षक राजेंद्र अहिर, बी.बी.चव्हाण आणि काही महिने अनिल साबळे यांच्याकडे होता. प्रभारी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत शिक्षक संघटना व शिक्षकांकडून अनेक तक्रारी शिक्षण विभागाकडे करण्यात येत होत्या. परंतु सेना भाजपा सरकारच्या काळात शिक्षण विभागामध्ये कोणत्याही बदल्या करण्यात न आल्याने या पदांचा कार्यभार प्रभारीच राहिला. नुकताच अहिरे यांच्याकडील पदभार काढून तो उत्तर मुंबई विभागाचे शिक्षक निरीक्षक साबळे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. तसेच औरंगाबद विभागीय निरीक्षकपद हे सुद्धा प्रभारींच्याच खांद्यावर होते. मात्र शिक्षण विभागाने केलेल्या बदल्यांमध्ये प्रभारी जबाबदाऱ्या दूर करत मुंबई विभागीय उपसंचालकपद राज्य मंडळाचे मुंबई विभागाचे सचिव संदीप संगवे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. तर औरंगाबाद विभागीय शिक्षण उपसंचालक पदाचा कारभार अनिल साबळे, पुणे शिक्षण उपसंचालक पदी औदुंबर उकिरडे, नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक पदी वैशाली जामदार, लातूर विभागीय शिक्षण उपसंचालकपदी गणपत मोरे यांची निवड करण्यात आली आहे.

तर, राज्य मंडळाच्या नाशिक विभागीय सचिवपदी राजेंद्र अहिरे, लातूर विभागीय सचिवपदी सुधाकर तेलंग, मुंबई विभागीय सचिवपदी सुभाष बोरसे, पुणे विभागीय सचिवपदी अर्चना कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाच्या उप आयुक्तपदी हारुण आत्तार, शैलजा दराडे यांची नियुक्ती झाली आहे.

(संपादन - सुमित बागुल )

Mumbai division got a full time deputy director burden reduced from shoulders of the in charge 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com