

Mumbai Central ST Depot
ESakal
मुंबई : एसटी महामंडळातर्फे राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक’ या उपक्रमात मुंबई विभागाने पुन्हा एकदा स्वच्छतेचा मानाचा तुरा पटकावला आहे. दुसऱ्या सर्वेक्षणाच्या निकालानुसार मुंबई विभागातील मुंबई सेंट्रल, दादर, कुर्ला नेहरूनगर आणि परळ या बसस्थानकांनी प्रादेशिक पातळीवरचे स्थान मिळवले आहे.