स्वाईन फ्लू ग्रस्त कॅनडातल्या ६८ वर्षीय व्यक्तीवर मुंबईत यशस्वी उपचार..मार्चमध्ये पर्यटनासाठी आले होते भारतात

swine flu
swine flu

मुंबई: मुंबईतील प्रत्येक रूग्णालयात सध्या ‘कोविड-19' आजाराच्या रूग्णांवर उपचार सुरू आहेत. डॉक्टर आणि परिचारिका दिवसरात्र या सेवेत आहेत. अशातच स्वाईन फ्लूची लागण झालेल्या एका ६८ वर्षीय कॅनेडियन रूग्णाचे मुंबईतील परळ येथील ग्लोबल रूग्णालयातील डॉक्टरांनी प्राण वाचवले आहेत. 

ही व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून ‘अँक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम’ (एआरडीएस) म्हणजेच तीव्र श्वसनाच्या विकाराने त्रस्त होती. साधारणतः आठ आठवडे त्यांच्यावर रूग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा दिसू लागल्यावर त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

वखारिया असे या रूग्णाचे नाव असून ते कॅनडामध्ये राहणारे आहेत. अनेक वर्षांपासून ते मधुमेह आणि उच्च रक्तदाब या विकाराने पिडीत आहेत. फेब्रुवारी २०२० मध्ये वखारिया पत्नीसह सुट्टी असल्याने मुंबईत फिरायला आले होते. त्यानंतर ते मार्चमध्ये कर्नाटकमध्ये कुर्ग या शहरात राहिले. काही हिल स्टेशनला भेट दिल्यानंतर ते पुन्हा मुंबईत परतले. मात्र, मुंबईत आल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडू लागली. कोविड-19 ची लक्षणे दिसू लागल्याने वैद्यकीय चाचणी सुद्धा करण्यात आली. परंतु, वैद्यकीय चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना तातडीने मुंबईतील ग्लोबल रूग्णालयात हलवण्यात आले.

या रूग्णालयात वैद्यकीय चाचणी अहवालात रूग्णाला एच2एन3 म्हणजे स्वाईन फ्लू असल्याचे निदान झाले. या आजारामुळे रूग्णाचे अन्य अवयव निकामी होऊ लागले होते. अशा स्थितीत डॉक्टरांनी हेमोडायलिसिस सुरू करून रूग्णाचे प्राण वाचवले. स्वाईन फ्लूचं निदान झाल्यानंतर डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू होते. डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे या रूग्णाना नवीन आयुष्य मिळाले आहे. प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे दिसून आल्यावर आठ आठवड्यांनी त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

‘‘या रूग्णाला न्यूमोनियाची लक्षणे असल्याने कोविड-19 चाचणी करण्यात आली. मात्र, वैद्यकीय चाचणी अहवाल निगेटिव्ह आला होता. न्यूमोनिया हा फुफ्फुसाचा अतिशय गंभीर आजार आहे. यामुळे फुफ्फुसाला रक्तातून ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. शरीरातील अन्य अवयव सुद्धा निकामी होऊ लागले होते. त्यामुळे त्यांना हेमोडायलिसिस सुरू करण्यात आले होते. प्रकृती खूपच खालावलेली असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. वैद्यकीय चाचणीत रूग्णाला स्वाईन फ्लू ची लागण झाल्याचे समोर आले आहे.'

रूग्णाची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना घरी सोडण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, मुंबईत कंटेन्ट झोनमध्ये राहत असल्याने त्यांना पुन्हा संसर्गाची भिती होती. हे लक्षात घेऊन देशातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून विमानाची व्यवस्था करण्यात आली आणि रूग्णाने थेट रूग्णालयातूनच उड्डाण केले. २ एप्रिल २०२० रोजी या रूग्णाला डिस्चार्ज देण्यात आला,” असं ग्लोबल रूग्णालयाच्या क्रिटिकल केअर युनिटचे प्रमुख डॉ. प्रशांत बोराडे यांनी म्हंटलंय.   

mumbai doctors did successful treatment on swine flu canadian patient read full story

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com