Mumbai Crime : सोमवार असल्याने ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा म्हणत डोंबिवलीतील ज्येष्ठ नागरीकाची लूट

गळ्यातील सोनसाखळी, अंगळी असा एकूण 53 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन भामटे पसार
Mumbai Crime
Mumbai Crime sakal
Updated on

डोंबिवली - भाजीपाला खरेदी करुन घरी निघालेल्या एका ज्येष्ठ नागरीकाला दोघा भामट्यांनी रस्त्यात गाठले. बोलण्यात त्यांना गुंतवूण सोमवार असल्याने ओम नमः शिवाय असा मंत्राचा जप त्याला करण्यास सांगत संमोहित केले.

त्यानंतर त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी, अंगळी असा एकूण 53 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन भामटे पसार झाले. दत्ताराम पाटे (वय 70) असे फसवणूक झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव असून याप्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनोळखी लोकांशी बोलणे ज्येष्ठ नागरिकांला चांगलेच महागात पडले आहे.

Mumbai Crime
Mumbai Crime News : चहाचे पैसे देण्यास मित्राने नकार देताच केला चाकूनं वार

डोंबिवली पश्चिमेतील गरिबाचा वाडा येथे राहणारे दत्ताराम हे सोमवारी सकाळी रेल्वे स्टेशन परिसरात बाजारातून भाजीपाला खरेदी करुन घरी निघाले होते. घनश्याम गुप्ते रोडने पायी चालत जात असताना ॲपेक्स रुग्णालयाच्या समोर दोघा भामट्यांनी त्यांना थांबविले.

Mumbai Crime
Mumbai Crime News : ब्लेडने बॅग कापून माल चोरणारी महिला गजाआड

त्यांच्याशी गप्पा मारत त्यांना सोमवार असल्याने ओम नमः शिवाय असा भोलेनाथचा मंत्राचा जप करण्यास सांगितले. याच दरम्यान भामट्यांनी दत्ताराम यांना संमोहित केले. संमोहित झाल्यावर भामट्यांनी दत्ताराम यांच्या गळ्यातील सोन्याची चेन, बोटातील अंगठी असा ऐवज काढून घेतला. दत्ताराम यांना बोलण्यात गुंतवणूक दोन्ही भुरटे घटनास्थळावरुन पळून गेले.

Mumbai Crime
Mumbai Crime : लग्नाचं आमिष दाखवून अभिनेत्रीवर केला अत्याचार ; गुन्हा दाखल

आपली फसवणूक दोन जणांनी केल्याचे कालांतराने भानावर आलेल्या दत्ताराम यांच्या लक्षात येताच त्यांनी विष्णूनगर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली केली. असाच प्रकार काही महिन्यांपूर्वी दिव्यातल्या सिध्दार्थ रेसिडेन्सीत राहणारे अनिल डेविड तांबे (वय 72) यांच्या बाबतीत डोंबिवली पूर्व भागात रेल्वे स्थानक परिसरात घडला होता.

बहुतांशी भामटे आणि भुरटे चोर शहराच्या बाहेरील ग्रामीण पट्ट्यात उभ्या राहिलेल्या बेकायदा चाळींमध्ये राहतात. त्यामुळे चोरी केल्यानंतर पळून जाणे आणि लपणे सहज त्यांना सोपे होते, असे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे अशा अनोळखी व्यक्तींच्या बोलण्यावर विश्वास ठेऊ नये, अन्यथा फसगत होण्याची शक्यता असते, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ganesh Chaturthi
Inter-district gang targeting senior citizens arrested in Pune
vaidyanath jyotirlinga temple
Lakhs of Devotees Visit Vaidyanath Temple on the Third Shravan Monday
Marathi News Esakal
www.esakal.com