Mumbai : डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा हस्तक रियाझ भाटीला अंधेरीतून अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dawood Ibrahim
Mumbai : डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा हस्तक रियाझ भाटीला अंधेरीतून अटक

Mumbai : डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा हस्तक रियाझ भाटीला अंधेरीतून अटक

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्या टोळीचा सदस्य आणि जवळचा हस्तक असलेल्या रियाझ भाटी याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. भाटीने एका व्यावसायिकाकडून खंडणी उकळली होती. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे.

रियाझ भाटी हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीचा एक सदस्य आणि त्याचा जवळचा हस्तक अशी रियाझची ओळख आहे. रियाझ आणि छोटा शकीलचा नातेवाईक सलीम फ्रूट याने अंधेरीतल्या एका व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसंच त्याच्याकडून महागडी वाहने घेत पैसेही उकळले होते. याच प्रकरणाशी संबंधित मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे.

गुन्हे शाखेच्या पुढच्या तपासासाठी आता त्यांनी सलीम फ्रुटच्या कोठडीचीही मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी एनआयए कोर्टात अर्ज केला आहे. आज पोलिस रियाझ भाटीला न्यायालयात हजर करून त्याच्या कोठडीची मागणी करणार आहे.

टॅग्स :MumbaiDawood Ibrahim