esakal | Mumbai Drugs Case लेन्सची डबी ते सॅनिटरी पॅड; ड्रग्ज नेण्यासाठी कशी लढवली शक्कल?
sakal

बोलून बातमी शोधा

लेन्सची डबी ते सॅनिटरी पॅड; ड्रग्ज नेण्यासाठी कशी लढवली शक्कल?

एनसीबीला क्रूजवर ड्रग्जबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर एनसीबीचे काही अधिकारी प्रवासी बनून तिथं गेले होते.

लेन्सची डबी ते सॅनिटरी पॅड; ड्रग्ज नेण्यासाठी कशी लढवली शक्कल?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबईत अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत ८ जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती एनसीबीने दिली आहे. यामध्ये बॉलिवूडमधील एका अभिनेत्याच्या मुलाचीही चौकशी केली जात असल्याचं म्हटलं जात आहे. क्रूजवर रेव्ह पार्टीवर एनसीबीच्या पथकाने शनिवारी रात्री छापा टाकला.

क्रूजवर ड्रग्ज कसं आणलं याबाबत आता माहिती समोर येत आहे. एनसीबीने ज्या बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलाला ताब्यात घेतलं आहे त्यानं लेन्सच्या डबीमधन ड्रग्ज आणल्याची माहिती मिळाली आहे. तसंच ज्या महिलांना ताब्यात घेण्यात आलं आहे त्यांनी पर्सचे हँडल आणि सॅनिटरी पॅडच्या आत लपवून ड्रग्ज आणले असल्याचं सांगण्यात येत आहे. याशिवाय काहींनी अंडरवीयर च्या शिलाईच्या आत आणि पॅन्ट च्या शिलाईच्या आत लपवून आणले असल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा: Mumbai drug case : NCBच्या कारवाईनंतर शाहरुखचा मुलगा चर्चेत

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार मुंबई क्रूज ड्रग्ज प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याची चौकशी सुरु असल्याचं म्हटलं जात आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितलं की, आर्यन खानवर कोणत्याही आऱोपाच्या प्रकरणात गुन्हा दाखल केलेला नाही. तसंच त्याला अटकसुद्धा कऱण्यात आलेली नाही.

एनसीबीला क्रूजवर ड्रग्जबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर एनसीबीचे काही अधिकारी प्रवासी बनून तिथं गेले होते. त्यानंतर समुद्रात क्रूज गेल्यानंतर जेव्हा पार्टी सुरु झाली तेव्हा एनसीबीने कारवाई केली. ही कारवाई तब्बल सात तास सुरु होती. या रेव्ह पार्टीमध्ये दिल्लीतील कंपनी असल्याचं सांगण्यात येत आहे. अटक केलेल्यांमध्ये दिल्लीतील तीन महिलांचा समावेश असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं आहे.

loading image
go to top