

Mumbai : शहरात दारूच्या नशेत वाहन चालवणाऱ्यांची संख्या चार पटीने वाढल्याचे धक्कादायक वास्तव वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
गेल्या वर्षी सुमारे अडीच हजार चालक दारूच्या नशेत सापडले होते.
या वर्षी हा आकडा ९,२८७ वर गेला आहे. दारूच्या नशेत वाहन चालविण्याचे गेल्या सहा वर्षांतील हे सर्वाधिक प्रमाण असल्याचे वाहतूक पोलिस सांगतात. २०१९ मध्ये ८,७९१ प्रकरणे समोर आली होती; मात्र पुढील दोन वर्षे कोरोना काळातल्या टाळेबंदीत गेली.