विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वाटलेल्या टॅबलेटबाबत धक्कादायक माहिती आली समोर, सविस्तर अहवाल सादर करण्याचेही निर्देश

समीर सुर्वे
Friday, 22 January 2021

महानगर पालिकेने चार वर्षांपुर्वी विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तरातील ओझे कमी करण्यासाठी आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना 43 हजार टॅबलेट दिले

मुंबई, ता. 22  : मुंबई महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या 43 हजार टॅबलेट पैकी 11 हजार 800 टॅबलेट बंद पडले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. कोविड काळात ऑनलाईन शिक्षणाचे महत्व अधोरेखीत झालेले असताना पालिकेचे टॅबलेट बंद पडल्याचे पडसात शिक्षण समितीच्या बैठकीत उमटले असून याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

महानगर पालिकेने चार वर्षांपुर्वी विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तरातील ओझे कमी करण्यासाठी आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना 43 हजार टॅबलेट दिले. या टॅबलेटमध्ये विद्यार्थ्यांची पाठ्यक्रमांची पुस्तके संग्रहीत करण्यात आली आहेत. याचा मोठा गाजावाजाही पालिका आणि सत्ताधारी शिवसेनेने केला.आता कोविड काळात ऑनलाईन शिक्षणाला महत्व आहे.हे संपुर्ण वर्ष ऑनलाईन पध्दतीनेच पार पडले. मात्र, अशाच वेळी 11 हजार 800 टॅबलेट बंद पडल्याने विद्यार्थ्यांचे नुकासन झाले.

महत्त्वाची बातमी : महाराष्ट्र बोर्डाच्या तब्बल २१ शाळा सुरु करण्यावर पालिकेचा शिक्कामोर्तब

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या डॉ. सईदा खान यांनी गुरुवारी झालेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत हरकतीचा मुद्दा उपस्थीत करुन याकडे लक्ष वेधले.पालिकेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जातात. मात्र, त्याचा फायदा कितपत होतोय? टॅबलेट बंद पडले आहेत, त्याकडे प्रशासन बघत नाही, असेही डॉ. खान यांनी नमुद केले.

"टॅबलेट दिले म्हणजे काम झाले नाही, त्याचा वापर योग्य व्हायला हवा. मुंबई पालिका प्रशासन धोरणात्मक निर्णय घेताना कोठेतरी चुकतेय का?" असा सवालही त्यांनी उपस्थीत केला. शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोशी यांनी हा हरकतीचा मुद्दा राखून ठेवला आहे. तसेच, याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश अध्यक्षांनी प्रशासनाला दिले आहेत.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

( संपादन - सुमित बागुल )

mumbai education news 43 thousand tabs distributed by BMC are of no use


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai education news 43 thousand tabs distributed by BMC are of no use