मुंबई : एसी लोकलच्या आठ फेऱ्या वाढणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

AC-Local

मुंबई : एसी लोकलच्या आठ फेऱ्या वाढणार

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना एसी लोकलची सुविधा देण्यासाठी सोमवारी, (ता.22) रोजीपासून जादा 8 फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. यांपैकी चार फेऱ्या अप आणि चार फेऱ्या डाऊन मार्गावर धावणार आहेत. त्यामुळे सोमवारपासून पश्चिम रेल्वेवर 12 फेऱ्यांऎवजी एकूण 20 फेऱ्या धावणार आहेत. नवीन आठ एसी लोकलमधील दोन लोकल पीक अव्हरमध्ये धावतील. यातील एक फेरी अप आणि एक फेरी डाऊन मार्गावर धावेल. तर, एसी लोकल चालविण्यासाठी पश्चिम रेल्वेने दोन नाॅन एसीची लोकलच्या फेऱ्या रद्द केल्या आहेत. तर, पश्चिम रेल्वेच्या लोकल वेळापत्रकात सहा नवीन फेऱ्या समाविष्ट केल्या आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वेवर एकूण 1 हजार 367 ऎवजी 1 हजार 373 होणार आहे.

पश्चिम रेल्वेवर सुरू होणाऱ्या आठ फेऱ्यापैकी अप दिशेकडे चार फेऱ्या धावतील. एक विरार आणि चर्चगेट दरम्यान, दोन बोरीवली आणि चर्चगेट दरम्यान आणि गोरेगाव आणि चर्चगेट दरम्यान धावेल. तर, डाऊन दिशेकडे चार फेऱ्या धावतील. एक चर्चगेट आणि नालासोपारा दरम्यान, दोन चर्चगेट आणि बोरीवली दरम्यान, एक चर्चगेट आणि गोरेगाव दरम्यान धावेल. या एसी लोकल धावण्यासाठी चर्चगेट ते वांद्रे दोन धीम्या मार्गावरील लोकल सेवा रद्द केली आहे. चर्चगेट ते वांद्रे साठी सकाळी 09.07 वाजता सुटणारी धीमी लोकल आणि वांद्रे ते चर्चगेटसाठी सकाळी 09.47 वाजता सुटणारी धीमी लोकल रद्द केली आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवर एकूण 1 हजार 367 ऎवजी 1 हजार 373 फेऱ्या धावतील.

हेही वाचा: मुंबई : पश्चिम रेल्वेवरून किसान रेल्वेच्या 101 फेऱ्या पूर्ण

अप दिशेकडील लोकल फेऱ्या

विरार ते चर्चगेट सकाळी 8.33 वाजता

बोरीवली ते चर्चगेट सकाळी 11.35 वाजता

बोरीवली ते चर्चगेट दुपारी 1.57 वाजता

गोरेगाव ते चर्चगेट दुपारी 4.14 वाजता

डाऊन दिशेकडील लोकल फेऱ्या

चर्चगेट ते बोरीवली सकाळी 10.24 वाजता

चर्चगेट ते बोरीवली दुपारी 12.45 वाजता

चर्चगेट ते गोरेगाव दुपारी 3.13 वाजता

चर्चगेट ते नालासोपारा रात्री 8.27वाजता

loading image
go to top