Mumbai News: निवडणूक येऊ तर द्या...आम्ही पण तयार आहोत

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रतिउत्तर
Dr. Srikant Shinde news
Dr. Srikant Shinde newssakal

Dr. Srikant Shinde news: हिंमत असेल तर पालिका, विधानसभा किंवा लोकसभा कुठल्याही निवडणुका लावून दाखवा असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला केले आहे.

ठाकरे यांच्या आवाहनाला बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार तथा मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रतिउत्तर देताना निवडणूक येऊ तर द्या...आम्ही पण तयार आहोत असे म्हणत निवडणूक आयोग आहे की नाही देशात काही. निवडणूका घेऊन दाखवा म्हणजे काय ? असा मिश्किल टोला देखील हाणला आहे.

कल्याण लोकसभा मतदार संघातील डोंबिवली मधील आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस कोर्ट व वातानुकूलित अभ्यासिकेचे लोकार्पण रविवारी खासदार डॉ. शिंदे यांच्या हस्ते झाले.

यावेळी गोपाळ लांडगे, दीपेश म्हात्रे, राजेश मोरे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना खासदार डॉ. शिंदे यांनी ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

निवडणुका लागणारचं आहेत. निवडणुका घेवून दाखवा म्हणजे काय ? देशात, महाराष्ट्रात निवडणूक आयोग आहे की नाही ? असा सवाल खासदार शिंदे यांनी केला. पुढे बोलताना त्यांनी अभ्यास केला असेल तर कोर्टात ओबीसी आरक्षण, प्रभाग रचना हे विषय प्रलंबित आहेत.

त्याची सुनावणी सुरू आहे. असे सगळे असताना इलेक्शन घ्या, इलेक्शन घ्या असं बोलल जातेय. आम्ही पण तयार आहोत इलेक्शनला. इलेक्शन येऊन द्या तरी असे मिश्किल हसत उत्तर दिले.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे पुन्हा एकदा कल्याण लोकसभेचा दौरा करणार आहेत. 14 फेब्रुवारी ला भाजपाच्या होणाऱ्या दौऱ्यावरून पुन्हा एकदा कल्याण लोकसभा मतदार संघावर भाजपा दावा ठोकणार का ? या चर्चाना उधाण आले आहे. यावर खासदार डॉ. शिंदे म्हणाले,

याआधी देखील केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर कल्याण मतदार संघात आले होते. मी स्वतः त्यांचे स्वागत केलं होतं. आता ते पुन्हा 14 तारखेला येथे येणार आहेत. त्यांचं स्वागत मी मतदारसंघाचा खासदार म्हणून करणार. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष मजबूत करण्याची संधी असते.

त्या दृष्टिकोनातून ते काम करत असतात, पावलं उचलत असतात. त्याच्यामध्ये दुसऱ्या कोणत्या गोष्टी करणे गरजेचे नाही. भाजप आणि बाळासाहेबांचे शिवसेना या दोन्ही पक्षात चांगले अंडरस्टँडिंग आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही राज्याचा गाडा चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जात आहेत.

विकास कामे चांगल्या पद्धतीने सुरू आहेत. गेल्या सहा महिन्यांमध्ये तीन वेळा देशाचे प्रधानमंत्री मुंबई येवून गेले. मोठे मोठे विकास कामांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले आहे. येणाऱ्या काळात डबल इंजिनचे सरकार चांगल्या प्रकारे अजून मजबुतीने काम करत राहील असे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com