

Mumbai Fake Police Robbery
Esakal
Mumbai Fake Police Robbery: दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरात एका केनियाई महिलेला ६६ लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम लुटणाऱ्या ४८ वर्षीय पुरूषाला पोलिसांनी अटक केली आहे. सुरेश रंगनाथ चव्हाण असे या आरोपीचे नाव असून त्याला बुधवारी ठाणे येथील त्याच्या घरातून अटक करण्यात आली. त्याचा साथीदार अद्याप फरार आहे.