esakal | ''कोणत्याही पक्षाला रेमडेसिवीर विकण्याचा अधिकार नाही''- राजेंद्र शिंगणे
sakal

बोलून बातमी शोधा

Rajendra Shingne FDA Minister

''कोणत्याही पक्षाला रेमडेसिवीर विकण्याचा अधिकार नाही''- राजेंद्र शिंगणे

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबई: महाराष्ट्र राज्यावर कोरोनाचं संकट असताना दुसरीकडे रेमडेसिवीरवरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप- प्रत्यारोपांच्या फैऱ्या सुरु आहेत. भाजपच्या नेत्यांनी आम्ही ब्रूक फार्माकडून रेमडेसिवीर विकत घेण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडून परवानगी घेतल्याचा दावा करत होते. मात्र आता दाव्यावर राजेंद्र शिंगणे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

कोणत्याही पक्षाला रेमडेसिवीर विकण्याचा अधिकार नसल्याचं सांगत भाजपमधील काही लोकांनी त्यांच्या पुरवठादाराकडून ते विकत घेण्यासाठी संपर्क केला होता. ते माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. आमचा विभाग रेमडेसिवीरच्या काळ्या बाजारात गुंतलेल्यांवर कारवाई करेल, असं भूमिका राजेंद्र शिंगणे यांनी घेतली आहे.

तसंच राजेंद्र शिंगणे यांनी मंगळवारी रात्री एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, रेमडीसीविर इंजेक्शन चा पुरवठा आणि साठा यावरून उलट सुलट तर्क लावल्या जात आहे आणि यावरून भारतीय जनता पक्ष माझ्या नावाचा अपप्रचार करत आहे. कुठलाही पक्ष हा वैयक्तिक रित्या इंजेक्शन साठा खरेदी करू शकत नाही, त्यांना तो सरकारला द्यावा लागतो.

हेही वाचा: लॉकडाऊनचा फटका; रिक्षा, टॅक्सी चालकांना प्रवासी मिळेना

तसंच पुढे ते म्हणतात की, भारतीय जनता पक्ष रेमडीसीविर विकित घेऊन मला देणार होते अशी उलट सुलट चर्चा समाज माध्यम आणि सोशल मीडिया वर सुरू असून ते सपशेल चुकीचं आहे. कुठल्याही पक्षाला रेमडीसीविर वैयक्तिकरित्या विकता येत नाही किंवा वाटता येत नाही ते त्यांना सरकार लाच द्यावे लागतील.

चार दिवसांपूर्वी राजेंद्र शिंगणे यांनी रेमडेसिवीरच्या तुटवड्यावर भाष्य केलं होतं. काही कंपन्यांनी मे महिन्यात इंजेक्शनचा पुरवठा करु असं सांगितलं. दरम्यान २१ तारखेनंतर रेमडेसिवीरचा पुरवठा मोठ्या प्रमाणात सुरु होईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.

no party has the right to sell remdesivir rajendra shingne

हेही वाचा: तब्बल ५१ लसीकरण केंद्र बंद, एक दोन दिवस पुरेल एवढाच कोरोना लसीचा साठा

loading image