साकीनाक्यात लागलेली आग दोन तासानंतर आटोक्यात, लाखोंचं नुकसान

साकीनाक्यात लागलेली आग दोन तासानंतर आटोक्यात, लाखोंचं नुकसान

मुंबईः  मुंबई उपनगरातील साकीनाका परिसरात पुन्हा आग लागल्याने येथील नागरिक आणि मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. साकीनाका परिसरातील 90 फिट रोडवरील खाडी नंबर 3 येथील प्लास्टिकच्या गोडाऊनला अचानक सकाळी 8:30 च्या सुमारास भीषण आग लागली. या परिसरात 3 ते 4 कारखाने असून दाटीवाटीने वसलेल्या पत्र्याच्या झोपड्या आहेत. या परिसरात दुमजली, तीन मजली घरे अनधिकृतरित्या वसवण्यात आलीत. येथे प्लास्टिक तसेच विविध कारखाने आहेत. 

अनेकदा आगीच्या घटनेने हा परिसर दणाणून जातो. येथे मोठ्या संख्येने गरीब नागरिक आणि मजूर राहतात. आज सकाळी 8:30 च्या सुमारास आग लागली. या आगीत काही गोडाऊनसह 6 ते 7 झोपड्या जळून खाक झाल्या. आग विझवण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान, 9 फायरवाहन, 6 जम्बो वोटर टॅंकर, 1 रेस्क्यू वाहन, 1 रुग्णवाहिका इत्यादी घटनास्थळी दाखल झाले.

येथील परिसरात अनेक गल्ल्या तसेच आगीच्या घटनास्थळी पोहोचण्यासाठी सोयीचा रस्ता नसल्याने अग्निशमन जवानांना मोठी कसरत करावी लागली. आग इतकी भीषण होती जर 2 लेव्हलवर असलेल्या आगीचा भडका अजून वाढला असता तर साधारण आजूबाजूच्या परिसरातील हजारो झोपड्या यात खाक झाल्या असत्या. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग दोन तासात आटोक्यात आणली. 

सुदैवाने यात कुणी जखमी वा जीवितहानी झाली नसली तरी लाखोंचं नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप समजले नसून या परिसरात गर्दुल्ले, चरसी लोक असल्याने ही आग जाणून बुजून लागत असल्याचा आरोप येथील नागरिक करताहेत. आगीच्या घटनेचा पुढील तपास साकीनाका पोलीस करत आहेत.

------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai Fire breaks out godown Sakinaka 90 feet road no casualty reported

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com