esakal | भिवंडीतल्या भावाकडून बिहारमध्ये राहणाऱ्या बहिणींना भाऊबीजेचं अनोखं गिफ्ट
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडीतल्या भावाकडून बिहारमध्ये राहणाऱ्या बहिणींना भाऊबीजेचं अनोखं गिफ्ट

भाऊबीज साजरी करण्यासाठी आपल्या मूळ गावी जाता न आल्यानं भिवंडीतल्या भावानं आपल्या बहिणीला अनोखी भेट दिली आहे. भिवंडीत राहणाऱ्या एका भावानं डोक्यावरील मागच्या बाजूच्या केसांमध्ये हॅपी भाईदुड असं कोरुन घेतलं

भिवंडीतल्या भावाकडून बिहारमध्ये राहणाऱ्या बहिणींना भाऊबीजेचं अनोखं गिफ्ट

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः देशभरात कोरोनाचं सावट असल्यामुळे दिवाळी हा सण साधेपणाने साजरा करण्यात आला. त्या भाऊबीज देखील एकत्रितपणे साजरी करण्यावर काही मर्यादा आल्या. अशातच भाऊबीज साजरी करण्यासाठी आपल्या मूळ गावी जाता न आल्यानं भिवंडीतल्या भावानं आपल्या बहिणीला अनोखी भेट दिली आहे. 

भिवंडीत राहणाऱ्या एका भावानं डोक्यावरील मागच्या बाजूच्या केसांमध्ये हॅपी भाईदुड असं कोरुन घेतलं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यानं आपल्या दोन्ही बहिणींचा आशीर्वाद घेतलाय. 

शंकरकुमार साहू असं या तरुणाचं नाव आहे. शंकरकुमार हा मूळचा बिहार राज्यातल्या गया जिल्ह्यातला रहिवाशी आहे. गेल्या ९ वर्षांपासून तो भिवंडीतल्या हनुमान नगर परिसरात राहत आहे. तो सध्या भिवंडीतल्या एका खासगी कंपनीत सुरक्षा रक्षकाचं काम करत आहे. शंकरकुमार याला तीन बहिणी आहेत. त्यातल्या दोन बहिणी बिहारमधील गया जिल्ह्यात राहतात. तर त्याच्या एका बहिणीचं निधन झालं.

अधिक वाचा-  बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचा आपण निर्धार करुया: अजित पवार

भिवंडीत नोकरीनिमित्त आल्यानंतर दरवर्षी दिवाळी साजरी करण्यासाठी मी माझ्या मूळगावी जात होतो. मात्र यंदा कोरोनाचं सावट असल्यामुळे मला गावी जाता आलं नाही. त्यामुळे सातव्यांदा डोक्यावरील केसांमध्ये बहिणींना शुभेच्छा देण्यासाठी हॅपी भाईदुज अक्षरं कोरली आणि व्हिडिओ कॉल करुन मी माझ्या बहिणींचे आशीर्वाद घेतल्याचं शंकरकुमार यानं सांगितलं.

अधिक वाचा-  शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचा आठवा स्मृतीदिन; शिवतीर्थावर गर्दी करु नये, मुख्यमंत्र्यांचं आवाहन

Unique gift bhai dooj from brother from Bhiwandi sisters living in Bihar