मुंबई : २६ जुलै २००५ महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भीषण दिवस (26 July Mumbai Flood). मुसळधार पावसाने त्या दिवशी मुंबई शहराला अक्षरशः ठप्प केलं होतं. २४ तासांत तब्बल ९४४ मिमी पावसाचा विक्रमी मारा झाला आणि शहरात तीनशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. केवळ माणसंच नव्हे, तर हजारो प्राण्यांचाही बळी गेला.