
मुंबईत मुसळधार पावसाने कहर केला असून, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. कुर्ला येथील क्रांती नगर आणि कुर्ला पूल परिसरात पाणी शिरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा जारी केला असून, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (NDRF) ची टीम घटनास्थळी तैनात करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी स्थानिक नागरिकांना जवळच्या शाळेत आश्रय घेण्याचे आवाहन केले आहे, जिथे अन्न आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील परिस्थितीचा आढावा घेतला आहे.