कुर्ला क्रांतीनगरमध्ये प्रत्येकाचे १० हजार पाण्यात

मुसळधार पावसाने मिठी नदीकिनारी वसलेल्या कुर्ल्यातील क्रांतीनगर परिसरात साचलेले पाणी.
मुसळधार पावसाने मिठी नदीकिनारी वसलेल्या कुर्ल्यातील क्रांतीनगर परिसरात साचलेले पाणी.

मुंबई : मिठी नदीच्या किनाऱ्यावरील क्रांतीनगर म्हणजे हातावर पोट असलेल्या कष्टकऱ्यांची वस्ती. दर पावसाळ्यात वस्तीला पुराचा धोका असतो. मागील दोन दिवसांतील पुरामुळे प्रत्येक घराला १० ते १२ हजारांचा फटका बसला आहे. लघुउद्योगांचे ३० ते ४० हजारांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

क्रांतीनगरमध्ये मजुरी करणारे पुरुष आणि घरकाम करणाऱ्या महिला अशी दीड हजार ते दोन हजार लोकवस्ती आहे. रिक्षाचालकांची संख्या मोठी असून, काही लघुउद्योगही आहेत. वस्तीत २००६ मध्ये हाहाकार उडाला होता. त्यावेळी एकमजली घरेही पाण्याखाली गेली होती. तेव्हापासून क्रांतीनगरच्या रहिवाशांच्या पुनर्वसनाची चर्चा सुरू आहे; मात्र कार्यवाही झालेली नाही. 

मागील तीन दिवसांतील मुसळधार पावसामुळे वस्तीतून सुमारे चार हजार रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. दोन दिवस वस्तीतील घरांत दोन-तीन फुटांपर्यंत पाणी होते. घरातील सर्व सामान फेकून द्यावे लागले. भाजीपाला-धान्य घराब झाले, असे रहिवाशांनी सांगितले. प्रत्येक घराचे सुमारे १० हजारांचे नुकसान झाले आहे. दोन दिवस रिक्षा पाण्यात होत्या. त्यामुळे दुरुस्तीवर दोन-तीन हजार रुपये खर्च होतील, असे रिक्षाचालक म्हणाले. त्यामुळे पतपेढीचा हप्ता कसा भरणार, असा प्रश्‍न त्यांनी केला. 

क्रांतीनगरमधील ३०० ते ४०० घरांत चप्पल आणि राख्या बनवणे असे लहान उद्योग चालतात. त्यांचे ४० ते ५० हजारांचे नुकसान झाले आहे, असे सांगण्यात आले. 

घरातील निम्मे सामान फेकून दिले. रोजचा खर्च भागवताना दमछाक होते. अाॅगस्ट महिन्यात दुप्पट खर्च कोठून करायचा? कोणीही मदत करत नाही. 
- नीता मोकल, रहिवासी

दोन दिवस घरात अन्न शिजले नाही. जे मिळाले, ते खाल्ले. आज घरात काहीच नाही. पुनर्वसनाची आश्‍वासने मिळाली; प्रत्यक्षात काहीही झाले नाही. आम्ही दरवर्षी मरणाचा सामना करतच जगतो.
- गीता सावंत, रहिवासी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com