Mumbai : रिक्षा,टॅक्सी चालकांना रिकॅलिब्रेशनसाठी चार दिवसाची मुदत, 1डिसेंबरनंतर रिकॅलिब्रेशन आरटीओची कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rickshaw

Mumbai : रिक्षा,टॅक्सी चालकांना रिकॅलिब्रेशनसाठी चार दिवसाची मुदत, 1डिसेंबरनंतर रिकॅलिब्रेशन आरटीओची कारवाई

मुंबई : राज्य परिवहन विभागाने रिक्षा,टॅक्सी, कुल कॅबची भाडेवाढ घोषीत केल्यानंतर दिलेल्या मुदतीच्या आत मध्ये वाहनांची रिकॅलिब्रेशन करण्याच्या सुचना रिक्षा,टॅक्सी चालकांना दिल्या होत्या. मात्र फक्त 34 टक्के वाहनांची रिकॅलिब्रेशन झाल्याची माहिती मिळाली आहे. चार दिवसात मिटर रिकॅलिब्रेशन करण्याची मुदत संपणार असून, 1 डिसेंबर पासून रस्त्यांवर धावणाऱ्या प्रत्येक वाहनाला मिटर रिकॅलिब्रेशन अनिवार्य राहणार आहे. दरम्यान रिकॅलिब्रेशन न झालेल्या रिक्षा,टॅक्सी चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे परिवहन विभागाने सांगितले आहे.

मुंबई महानगरात सुमारे 5 लाखांच्या घरात रिक्षा तर 50 हजारांपेक्षा जास्त टॅक्सीची संख्या आहे. यातुलनेत रिकॅलिब्रेशन करणारे सेंटर मात्र कमी असल्याचे रिक्षा चालकांकडून सांगितले जात आहे. सध्या रस्त्यांवरील प्रवासी वाहतुक करणाऱ्या सर्वाधीक रिक्षा,टॅक्सी चालकांकडून अद्याप रिकॅलिब्रेशन झाले नसल्याचे स्पष्ट होत असतांना, येत्या चार दिवसांमध्ये मुंबई महानगरातील रिक्षा,टॅक्सी वाहनांचे मिटर रिकॅलिब्रेशन शक्य नसल्याचे दिसून येत आहे.

परिणामी परिवहन विभागाकडून येत्या गुरूवार पासून प्रत्येक दिवसांच्या विलंबासाठी एक दिवस परवाना निलंबन करण्यात येणार असून, किमान सात दिवस किंवा त्यापेक्षा जास्तीत जास्त 90 दिवस परवाना निलंबनाची तरतुद आहे. मुदत समाप्तीनंतर प्रतिदीन 50 रूपये आणि जास्तीत जास्त पाच हजार रूपये विभागीय दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही परिवहन विभागाने सांगितले आहे.

मिटर रिकॅलिब्रेशन 34 टक्के पुर्ण झाले आहे. त्यामूळे 100 टक्के रिकॅलिब्रेशन होण्यासाठी वाहन चालकांना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. रिक्षा,टॅक्सी चालकांना ही शेवटची मुदत राहणार आहे. अन्यथा कारवाई केली जाणार आहे.

- भरत कळसकर, आरटीओ, मुंबई सेंट्रल