मुंबई : खासगी वाहतुकदारांकडून सर्वसामान्यांची लुट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मुंबई : खासगी वाहतुकदारांकडून सर्वसामान्यांची लुट

मुंबई : एसटीच्या संपामूळे खासगी वाहतुकदारांची चांदी झाली आहे. एसटीच्या आगारातूनच प्रवासी वाहतुक सुरू आहे. शिवाय राज्यभरात खासगीला तात्पुरती टप्पा वाहतुकीची परवानगी सुद्धा मिळाली आहे. मात्र, यावर परिवहन विभागाचे नियंत्रण नसल्याने एसटीच्या भाडे दरांपेक्षाही सर्रास भाड्यांची वसूली सुरू आहे. परिवहन विभागाने जादा भाडे आकारणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. मात्र, सध्यातरी कारवाई शुन्य आहे.

एसटी बस ऐवजी महामंडळाच्या आगारातून प्रवासी वाहतुक सुरू आहे. त्यांना एसटीच्या तिकीट दरामध्येच प्रवाशांची वाहतुक करायच्या सुचना दिल्या आहे. त्यावर नियंत्रण आणि समन्वय करण्यासाठी परिवहन विभागाने मोटार वाहन निरिक्षकांना नियुक्त केले आहे. त्यानंतरही या खासगी वाहतुकदारांकडून एसटीच्या भाड्यापेक्षा जास्त भाडे दराची वसुली केली जात आहे. त्याशिवाय खासगी बसेसला एसटी भाड्याच्या दिडपट जादा भाडे वसूलीची परवानगी असतांना त्यांनी मनमानी भाडे वसुली सुरू आहे.

हेही वाचा: Pune: तुम्ही कधी उलटा वडापाव खाल्ला आहे का?;पाहा व्हिडिओ

तक्रारीसाठी फक्त ई-मेलची सुविधा

जादा प्रवासी भाडे वसूल केल्यास परिवहन विभागाने नागरिकांनी करण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी फक्त dycommr.enf2@gmail.com हा ई-मेल दिला आहे. मात्र, ग्रामीण भागातील प्रत्येक प्रवासी ई-मेल वापरणाराच असेल असं नाही. त्यामूळे परिवहन विभागाकडून जादा भाडे वसूली विरूद्ध प्रभावी जनजागृतीचा अभाव दिसून येत आहे. शिवाय प्रवाशांची आर्थिक लुट झाल्यानंतर ई-मेलने तक्रार करण्याची प्रक्रिया क्लिष्ट आहे.

हेही वाचा: KDMC च्या सहाय्यक आयुक्तांना मारहाण; माजी नगरसेवकासह पत्नीवर गुन्हा दाखल

या मार्गावर जादा भाडेदरांची वसूली

मार्ग - एसटीचे दर - वाहन प्रकार - राज्य खासगी वाहतुकीचे दर सुमारे

दादर - स्वारगेट - शिवनेरी - 525 - सुमारे 800 पर्यंत

मुंबई - अलीबाग - साधी - 160 - 300

मुंबई - कोल्हापुर - साधी - 565 - 800

पुणे-औरंगाबाद - साधी - 340 - 500

पुणे- अकोला - साधी - 715 - 1000

नाशिक पंढरपूर - साधी 420 - 700

जादा भाडे वसुलीसंदर्भात एकही तक्रार आल्यास त्या खासगी वाहतुकदारांवर कठोर कारवाई करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांच्या बैठकीत देण्यात आल्या आहे. सर्वसामान्यांनी परिवहन विभागाच्या ई-मेल, किंवा स्थानिक आरटीओ कार्यालयात लेखी तक्रारी कराव्या

- अविनाश ढाकणे, आयुक्त, परिवहन विभाग

loading image
go to top