
मुंबई : अवघ्या दोन आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची जोरदार तयारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सुरू केली असून, गणरायांचे आगमन होऊ लागले आहे. रविवारी मुंबईतील काही मोठ्या मंडळांच्या बाप्पाचे आगमन मोठ्या थाटामाटात, वाजत-गाजत झाले. मात्र काही वाहतूक पोलिसांच्या नियोजनाच्या अभावामुळे काही ठिकाणी वाहतूककोंडी झाली होती.