विघ्नहर्त्याला निरोप देण्यासाठी महापालिका सज्ज; 173 कृत्रिम विसर्जन स्थळे

विसर्जन स्थळांवर येण्यासाठीही लसीचे निर्बंध
Ganpati visarjan bmc preparation
Ganpati visarjan bmc preparationsakal media
Updated on

मुंबई : अनंत चतुर्थीसाठी (ता.19) महानगरपालिकेने (BMC) तयारी पुर्ण केली आहे. 73 नैसर्गिक विसर्जन स्थळे, 173 विसर्जन स्थळांवर महानगरपालिकेने तयारी पुर्ण केली आहे. तसेच, मिरवणुकीला बंदी असून भक्तांना (Ganesha Devotees) विसर्जनही करता येणार नाही. यासाठी मुर्ती संकलन केंद्रांसह फिरती विसर्जन स्थळे सुरु करण्यात आली आहेत. तसेच, प्रतिबंधीत क्षेत्र आणि सील्ड इमारतीतील गणपती विसर्जनची (Ganpati visarjan) सोय तेथेच करावी असे आवाहनही महानगरपालिकेने केले आहे. विसर्जन स्थळापर्यंत कोविड लसीचा दुसरा डोस (corona vaccination) घेतल्या नंतर 15 दिवस उलटलेल्या पाच जणांनी यावे असेही महानगर पालिकेकडून सांगण्यात आले आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांंवर साथरोग नियंत्रण कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई होण्याची शक्यता आहे.

Ganpati visarjan bmc preparation
मुंबई-ठाण्यातील अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसा

सलग दुसऱ्या वर्षी कोविडच्या पाश्‍र्वभुमीवर गणपती विसर्जन होणार आहे.त्यामुळे यंदाही भाविकांना स्वत: विसर्जन करण्याची परवानगी नाही.त्यासाठी कृत्रिम विसर्जन स्थळे तसेच नैसर्गिक विसर्जन स्थळांवर मुर्ती संकलन केंद्र तयार करण्यात आले आहेत.या केंद्रांमध्ये मुर्ती दान करणे आवश्‍यक आहे.24 प्रभागात साधारण 25 हजार कर्मचारी अधिकारी तैनात आहेत.नागरीकांना कोविड नियमावलीचे पालन करावे असे आवाहन महानगर पालिकेने केले आहे.मिरवणुक न काढता मुर्ती विसर्जन स्थळांवर आणावी.कोविडचा दुसरा डोस घेऊन 15 दिवस झालेल्या पाच व्यक्तींना विसर्जन स्थळांवर पर्यंत येता येणार आहे.असेही महानगर पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.

महापालिकेची तयारी

नैसर्गिक व कृत्रिम विसर्जन स्‍थळी 715 जीवरक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.नैसर्गिक विसर्जन स्थळी 587 ‘स्टील प्लेट’ची व्‍यवस्‍था करुन तात्पुरते वाहन मार्ग तयार करण्यात आले आहेत. याचबरोबर विविध 338 निर्माल्य कलश, 182 निर्माल्य वाहन, 185 नियंत्रण कक्ष, 144 प्राथमिक उपचार केंद्र, 39 रुग्णवाहिका इत्यादींची व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त 145 स्वागतकक्ष, 84 तात्पुरती शौचालये, 3 हजार 707 फ्लड लाईट, 116 सर्च लाईट, 48 निरीक्षण मनोरे आणि नैसर्गिक विसर्जन स्थळांच्या ठिकाणी 36 मोटर बोट व 30 जर्मन तराफा असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com