
A shocking moment from Vasai Virar creek during Ganpati Visarjan shows a youth swept away by strong currents, highlighting festival safety issues
esakal
गणेशोत्सवाच्या उत्साहात बुडालेल्या वसई-विरार परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. चिक्कल डोंगरी खाडी परिसरात गणपती विसर्जनादरम्यान एक तरुण पाण्यात वाहून गेल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्याने स्थानिक नागरिकांमध्ये खळबळ उडवली आहे. या हादस्याने गणेशोत्सवाच्या उत्साहावर विरजण पडले आहे.