Bandra East encroachment removal violence update
esakal
मुंबई : गरीब नगर येथील अतिक्रमण हटवण्यासाठी बुधवारी दुसऱ्या दिवशी सकाळी ९च्या सुमारास जेसीबी, पोकलेन आणि ट्रकसह रेल्वेचे पथक दाखल झाले. पहिल्या दिवसाप्रमाणेच आजही मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला (Mumbai Garib Nagar demolition clash latest news) होता. दुपारपर्यंत कारवाई सुरळीत सुरू होती; मात्र संध्याकाळी ४च्या सुमारास प्रार्थनास्थळावर कारवाई झाल्याचे वृत्त पसरताच स्कायवॉकखाली मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले. त्यांनी कारवाई थांबवण्याची मागणी केली, तर काहींनी पोलिसांशी हुज्जत घातली.